त्यांचे विद्यार्थिनींसाठी असेही दातृत्व...

Image may contain: 11 people, people smiling, people standing and outdoorविठ्ठलवाडी,ता.२२ जुलै २०१९(प्रतिनीधी) : दातृत्वाच्या माध्यमातुन समाजात मदत करणारे अनेक असतात.परंतु अपेक्षा न ठेवता शालेय विद्यार्थिनींना तब्बल ९० रंगीत गणवेश कुरुळी(ता.शिरुर) येथील महेश खळदकर यांनी देत नवा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक सुरेश थोरात यांनी केले.

Image may contain: one or more people and outdoorन्हावरे (ता.शिरूर) येथील 'मयुर कलेक्शन अॅण्ड रेडिमेडस्' चे महेश खळदकर यांचे वतीने विठ्ठलवाडी (ता.शिरूर) येथील श्री.पांडुरंग विदया मंदिर या प्रशालेतील तब्बल ९० मुलींना रंगीत गणवेश देण्यात आले.यावेळी ते बोलत होते.या छोटेखानी कार्यक्रमात विदयालयाच्या वतीने खळदकर यांच्या दातृत्वाबदद्ल त्यांचा सन्मानाचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
 
यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की, समाजामध्ये, सामाजिक बांधिलकी मानुन काम करणाऱ्या अनेक व्यक्ती आहे. त्यांच्या कर्तृत्व व दातृत्वातुन समाज उभा राहत असतो. महेश खळदकर हे त्यापैकी एक असुन त्यांच्या दातृत्वाचा आदर्श आजच्या युवा पिढीने घेणे आवश्यक आहे. याशिवाय विविध शाळांमध्ये अनेक गरजू आणि होतकरू विद्यार्थी प्रतिकुल परिस्थितीशी झगडत आहेत. समाजाने मदतीचा हात त्यांच्या पर्यंत पोहचवला पाहिजे असे ते म्हणाले.

याप्रसंगी विदयालयाचे मुख्याध्यापक सुरेश थोरात, महेश खळदकर, सहकारी संस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण गवारी,शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संभाजी शिंदे, हनुमान तरुण मंडळाचे अध्यक्ष बबनराव गवारे, अॅड. युनुस माणियार, उत्तम  भाटी, भाऊसाहेब वाघ, प्रभाकर चांदगुडे, अरुण शिंदे, विशाल कुंभार, बाळासाहेब गायकवाड, प्रविणकुमार जगताप, संगीता गवारी, विठ्ठल गवारी, प्रकाश राऊत,नंदकुमार चौधरी, नरेंद्र गायकवाड, विठ्ठल माळी यांसह विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.या कार्यक्रमाचे प्रभाकर चांदगुडे यांनी सुत्रसंचालन केले तर विशाल कुंभार यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या