जिकडे तिकडे एकच चर्चा; मंगलदास बांदल यांचीच...

Image may contain: 10 people, people smiling, people standingशिरुर,ता.२२ जुलै २०१९(प्रतिनीधी) : गावचा कोपरा असो कि तालुक्याचे ठिकाण सर्वञ चर्चा आहे ती नेहमीच चर्चेत राहणा-या पैलवान मंगलदास बांदलांचीच...

शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हयात सर्वञ गेल्या काही दिवसांत राजकारणासह इतरही क्षेञात राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यासह अन्य नेत्यांवर गुन्हे दाखल झाल्याने तसेच राज्याचे माजी उपमुख्यमंञी अजित पवार व माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांची जोरदार केलेली बॅटिंग यामुळे राजकारण पुरते ढवळुन निघाले आहे.

जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशउपाध्यक्ष मंगलदास बांदल हे नेहमीच चर्चेत असतात.मंगलदास बांदल तसे शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हयात सर्वांच्या परिचित आहेत ते वक्तृत्वाने.शिरुर तालुक्यातील कोणत्याही गावात कसलाही कार्यक्रम असो त्यांची हजेरी ठरलेलीच.अगदी दशक्रिया विधी जरी असला किंवा कार्यक्रम त्यांची वक्तृत्व अन भाषणे ऐकायला अनेक आतुर असतात.त्याचप्रमाने इतर राजकिय कार्यक्रमात त्यांची फटकेबाजी अन चौफेरटिका हि ठरलेलीच.नुकत्याच झालेल्या लोकसभेत त्यांनी राजकिय व्यासपीठावर जाउन केलेले भाषण इतके व्हायरल झाले कि त्याला लाखोंच्या पटीत लाइक,कमेंट अन शेअर मिळाल्याच परंतु तालुक्यात नव्हे तर जिल्हयात व्हायरल झाले.

काही दिवसांपुर्वी शिरुर पोलीस स्टेशन व शिक्रापुर पोलीस स्टेशनला मंगलदास बांदल यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर सर्वञ खळबळ उडाली.परंतु माझ्यावर आजपर्यंत अनेक चौकश्या झाल्या परंतु तरीही मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे सांगत बांदल यांनी व्हिडिओ शेअर केला.तो ही सोशल मिडियावर जोरात व्हायरल झाला.

दरम्यान माजी खासदार व शिवसेनेचे उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांनी पञकार परिषदेत,बांदल यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असून, जमीन व्यवहारातील त्यांच्या फसवणुकीने दोनशे ते पाचशे कुटुंबे उद्‌ध्वस्त झाली आहेत. या दोघांचाही इतिहास तपासला तर हाणामाऱ्या करणे, खंडणी गोळा करणे, जमिनीच्या व्यवहारातून फसविणे, उद्योजकांना धमकावणे हेच यांचे उद्योग असल्याचे दिसून येईल. आता सगळे अंगलट आले की आमच्या नावाने खापर फोडायचे, हे चुकीचे आहे. असे सांगत टिका केली.

त्यामुळे पुन्हा बांदल यांचीच शिरुर तालुक्यात जोरदार चर्चा होत असुन या टिकेवर बांदल हे काय उत्तर देणार याचीच उत्सुकता तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला लागुन आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या