मंगलदास बांदल यांना एका गुन्हयात जामीन; मात्र...

Image may contain: 1 person, smilingशिक्रापूर, ता.२२ जुलै २०१९ (प्रतिनीधी) : राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांना एका गुन्हयात जामीन मिळाला असून. दुस-या गुन्हयाबाबत मात्र संदिग्धता कायम आहे.

शिरुर पोलीस स्टेशनला जमीन विक्री प्रकरणात फसवणुकीचा बांदल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर शिक्रापुर पोलीस स्टेशनलाही अशाच प्रकारे दुसरा गुन्हाही दाखल करण्यात आला होता.दरम्यानच्या काळात पुणे ग्रामीणचे पोलीस बांदल यांना अटक करण्याच्या तयारीत होते.याच पार्श्वभूमिवर बांदलांनी पुणे न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन फेटाळला गेला म्हणून त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आपले म्हणणे मांडले असता मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन मंजुर केला असल्याची माहिती शिरुर पोलिसांनी दिली.शिक्रापूर येथील दूस-या प्रकरणात बांदल यांचे वतीने पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला असून त्यावर अद्याप पुणे न्यायालयाने निकाल दिलेला नाही. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी सांगितले की, आमचेकडे दाखल प्रकरणानुसार कायदेशीर योग्य कार्यवाहीच्या दिशेने आमची पावले टाकणे सुरू आहे. योग्य वेळी योग्य ती कारवाई दिसून येईल.

शिरुर च्या गुन्ह्याप्रकरणी जामीन मिळाल्याने बांदल यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दुस-या प्रकरणात जामीन होणार का ? पोलीस बांदलांना अटक करणार का असे प्रश्न सर्वसामान्यांकडून केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या