...तेव्हा माजी जि.प.अध्यक्षांनाही तो मोह आवरत नाही

Image may contain: one or more people, people playing sport, tree, sky, outdoor and natureरांजणगांव सांडस,ता.२५ जुलै २०१९(प्रतिनीधी) : राजकिय मैदानावर जोरदार फटकेबाजी करणा-या व एकेकाळी क्रिकेट चे मैदान गाजविणा-या या नेत्याला रस्त्याने जात असताना तेव्हा माञ क्रिकेट खेळण्याचा मोह आवरत नाही.

Image may contain: one or more people, people standing, sky, tree, outdoor and natureयाबाबत सविस्तर असे कि,पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे तसे राजकारणातील मातब्बर खेळाडु म्हणुन सध्या ओळखले जातात.परंतु एकेकाळी क्रिकेट च्या मैदानावरही त्यांनी उत्तम कामगिरी करत चांगले मैदानही गाजविले आहे.ते नुकतेच शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील गावांच्या दौ-यावर नागरिकांच्या भेटीगाठी घेत होते.

नुकतेच रांजणगांव सांडस या परिसरातुन जात असताना सोसायटीच्या मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत होती.या वेळी कंद यांनी स्वत:ची गाडी थांबवत मुलांशी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.यावेळी जोरदार फटकेबाजी करत स्वत:तील उत्तम खेळाडु अद्याप तसाच असल्याचे त्यांनी या निमित्ताने दाखवुन दिलेच परंतु माजी जि.प.सदस्य असलेला नेता मुलांशी क्रिकेट खेळतोय हे पाहुन गावातील अनेकजण अवाक झाले.तर मुलांच्याही चेह-यावर वेगळाच आनंद यावेळी पहावयास मिळाला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या