पॉलीशच्या बहाण्याने सहा तोळे सोने केले लंपास

No photo description available.तळेगाव ढमढेरे,ता.२५ जुलै २०१९(जालिंदर आदक) :  येथील माळी मळा रस्ता आनंद नगर कॉलनी मधील एका महिलेचे सुमारे सहा तोळे सोने उजळून देतो या बहाण्याने दोन भामट्यांनी लुबाडणूक केल्याची घटना या परिसरात घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पद्ममा दत्तात्रय बोरावके या महिलेच्या घरासमोर दोन २५-२६ वर्षीय तरुण आले त्यांनी त्यांच्याकडील बॉक्स दाखवून आमच्याकडे सोने उजळण्याची पावडर आहे या पावडरने सोने उजळून देतो तुम्हाला घ्यायची आहे का? असे विचारले व त्यांनी त्यांच्याकडील तांब्याच्या वस्तू पॉलिश करून दाखवल्या परंतु महिलेने त्यांना सांगितले की पावडर आम्हाला घ्यायची नाही. तेव्हा दोन्ही भामटे म्हणाले तुमच्या गळ्यातील सोने काढून द्या तुम्हाला मी उजळून दाखवतो, महिलेने गळ्यातील दागिने नकली असल्याचे सांगितले त्यामुळे आम्हाला तुमची पावडर द्यायची नाही असे त्या महिलेने सांगितले.

त्यावेळी ते दोघे म्हणाले तुमच्या गळ्यातील गंठण द्या महिलेने देण्यास नकार देऊनही महिलेच्या गळ्यातील गंठण काढले व हातातील बोटामधील सोन्याची अंगठी काढली व महिलेला सांगितले तुम्ही घरातील कुकर घेऊन या, महिलेने किचनमध्ये जाऊन कुकर आणला. त्यानंतर त्यांनी महिलेला पाणी घेऊन या असे सांगितले त्यातील एक इसमाने कुकर मध्ये पाणी टाकून त्यांचे जवळील पावडर त्या कुकर मध्ये टाकून महिलेच्या गळ्यातील गंठण व हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी त्यामध्ये टाकली आणि झाकण आणण्यासाठी घरात लावले. त्यापैकी एक जण कुकर घेऊन किचन मध्ये आला व त्याने सांगितले की कुकर दहा मिनिट गॅसवर ठेवा असे सांगून ही दोघे भामटे पसार झाली. दहा मिनिटांनी कुकर चे झाकण उघडून पाहिले तर त्यामध्ये सोने नव्हते म्हणून लगेच बाहेर येउन पाहीले असता चोरटे सहा तोळे सोने घेऊन पळाले होते.

या प्रकरणी शिक्रापुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज निलंगेकर हे करत आहे

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या