शेतीशाळा उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा-भगत

Image may contain: one or more people, people standing, outdoor and natureनिर्वी,ता.२७ जुलै २०१९(प्रतिनीधी) : कृषी विभागाच्या माध्यमातून कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत (निर्वी,ता.शिरूर) येथे ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतीशाळा उपक्रमास प्रारंभ झाला असुन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी सहायक जयवंत भगत यांनी शेतीशाळा वर्गात केले आहे

कृषि विभागाच्या माध्यमातून शेतीशाळा हा उपक्रम सुरू केला असुन (निर्वी,ता.शिरूर) येथे ऊस पिकाच्या उत्पादन वाढीसाठी शेतीशाळा सुरू करण्यात आली. पार पडलेल्या शेतीशाळा मध्ये ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.प्रात्यक्षिकासाठी जयसिंग बाळासाहेब सोनवणे यांचे एक एकर क्षेत्र निवडले असुन दर 15 दिवसानी त्यांच्या शेतावर कार्यक्रम घेण्यात येणार आहे.लागवडीपासुन 150 दिवस हा कार्यक्रम होणार आहे.

शेतीशाळेमध्ये प्रत्यक्ष शेतात प्रात्यक्षिक राबविण्यात येणार असुन ऊस लागवडीपासुन ते ऊस बांधणी पर्यंत प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून तंत्रज्ञान शेतकऱ्यांना देऊन एकरी उत्पादन वाढविण्यात येणार आहे. पार पडलेल्या शेतीशाळा मध्ये कृषि सहायक अंकुश परांडे यांनी शेतीशाळेची संकल्पना व प्रस्तावना केली व कृषि सहायक संतोष बेंद्रे यांनी बेणे प्रक्रिया व लागवडीच्या पध्दती बाबत मार्गदर्शन केले.

उपस्थित शेतकऱ्यांमध्ये आप्पासाहेब सोनवणे यांनी शेतीशाळा वर्गाचा लाभ उत्पादन वाढीसाठी नक्कीच होईल व तंत्रज्ञान मिळेल त्यामूळे या उपक्रमाचे कौतुक केले तर कुंडलिक सोनवणे शेतीशाळा माध्यमातून तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतावर राबविण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना सहज तंत्रज्ञान लक्षात येईल व स्वतःच्या शेतावर राबविता येईल.तसेच प्रविण सोनवणे यांनी सांगितले कि प्रकाश सापळा तंत्रज्ञान वापरले असल्याने हुमणी चे भुंगेरे नायनाट करण्यास मदत झाली. तसेच शेतीशाळा उपक्रमास फायदा उत्पादन वाढीसाठी होईल तसेच बाबासाहेब साळुंके यांनी ही समाधान व्यक्त करून मनोगत व्यक्त केले.संतोष सोनवणे यांनी आभार मानले व या कार्यक्रमासाठी जयसिंग सोनवणे सहकृषि सहायक जयवंत भगत यांचे योगदान लाभले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या