प्रफुल्ल कदम यांना राज्यपालांच्या हस्ते शौर्यपदक प्रदान

रांजणगाव गणपती,ता.२७ जुलै २०१९(प्रतिनीधी) : रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम यांना राज्यपालांच्या हस्ते नुकताच शौर्यपदक प्रदान करण्यात आला.

प्रफु्ल्ल कदम हे रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनला सहायक पोलीस निरीक्षक म्हणुन सध्या कार्यरत आहेत.कदम यांनी पोलीस सेवेत सुमारे ९ वर्षे सेवा बजावली असुन गडचिरोली येथे नक्षलप्रवण क्षेञात सन २०११-२०१४ या काळात काम करताना उल्लेखनिय कामगिरी केली.गडचिरोली मधील बेजुरपल्ली जंगल परिसर,छत्तीसगड राज्यामध्ये चांदुर जंगल,आंबेझरा जंगल,रोमपल्ली जंगल,रोमपल्ली जंगल,मंडोली जंगल,अबुझमाड जंगल आदी परिसरात नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत सहभाग घेत झालेल्या चकमकांमध्ये उल्लेखनिय कामगिरी केली.या झालेल्या चकमकांमध्ये नक्षल्यांचे मृतदेह व मोठा शस्ञसाठा जप्त करण्यात आला होता.त्यांच्या याच कार्याची दखल घेत खडतर सेवेबद्दल विशेष सेवा पदक,आंतरिक सेवा पदक,पोलीस महासंचालक सन्मानचिन्हाने गौरविण्यात आले आहे.ठाणे येथेही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

गडचिरोली येथे नक्षलवाद विरोधी अभियानांतर्गत केलेली कामगिरी लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक कदम यांना राष्ट्रपती शौर्य पदकाने नुकताच राज्यपाल सी.विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.यावेळी राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस,गृहराज्यमंञी दिपक केसरकर,रणजित पाटील, पोलीस महासंचालक सुबोध जैस्वाल आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या