वसेवाडीत विद्यार्थ्यांनी अनुभवला तंत्रज्ञानाचा अविष्कार

Image may contain: 6 peopleसणसवाडी,ता.२९ जुलै २०१९(निलेश पोपळघट) : अवकाशातले ग्रहतारे आपल्या जवळ आले आणि चक्क ते हातात घेऊन पाहता आले.प्रत्यक्ष सुर्य तळपतोय व ग्रह त्याभोवती फिरत आहे असे अंतराळातील अनोखे दृष्य थेट हाताळण्याची संधी वसेवाडी (सणसवाडी) शाळेतील विद्यार्थ्यांना मिळाली.

शाळेतील उपक्रशील शिक्षक नंदकिशोर पडवळ यांनी ‘एक्सप्लोरर फॉर मर्जक्युब’ या अॅप्लिकेशनचा वापर करुन विद्यार्थ्यांना सुर्यमालेची व ग्रहांची माहिती करुन दिली.

या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थी हरखून गेले. सुर्यमालेतील ग्रह व त्यांचे उपग्रह यांची सुर्यमाला हे सर्व विद्यार्थ्यांना जवळून पाहता आले, तर काही मुलांनी उत्सुकतेने हात लावून पाहिला आणि आपण सुर्य जवळून पाहतोय, असा त्यांना भास झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

अवघड वाटणारा भूगोल विषय रंजकतेने शिकणे सुलभ झाले.या तंत्रज्ञानाचा आविष्कार इ.१ली ते ८वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षकांनी अनुभवला. नविन तंत्रज्ञानाने दृश्य स्वरुपात विद्यार्थ्यांना शिकविल्याने त्यांच्या कायम स्मरणात राहते, असे शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या