एमआयडीसी कर्मचाऱयाला शितोळेकडून नशेत मारहाण

No photo description available.शिरुर, ता. 1 ऑगस्ट 2019: शिंदोडी (ता.शिरुर) येथील MIDC च्या पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी पांडूरंग फडके यांना गावातील संजय उमाजी शितोळे याने दारुच्या नशेत मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संजय शितोळे हा जय मल्हार क्रांती संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष दौलत शितोळे यांचा भाऊ आहे. तर पांडूरंग फडके हे पत्रकार तेजस फडके यांचे बंधू आहेत.

पांडूरंग फडके हे शिंदोडी येथील MIDC च्या पाणी पुरवठा विभागात काम करतात. बुधवारी (ता. 31) रोजी रात्री ८ च्या सुमारास संजय शितोळे हा दारूच्या नशेत MIDC च्या गेट जवळ आला आणि तेथे कामावर असलेले कर्मचारी पांडूरंग फडके यांना गेट उघड, आमची रात्री उशिरा मासे न्यायला गाडी येणार आहे असे सांगितले. त्यावेळी पांडूरंग फडके यांनी तुमची गाडी आली की लगेच गेट उघडतो. MIDC च्या अधिकाऱ्यांनी गेट बंद ठेवायला सांगितले आहे, असे संजय शितोळे याला सांगितले. त्यानंतर शितोळे याने फडके यांना शिवीगाळ करत दगडाच्या साहयाने MIDC च्या गेटच कुलूप तोडले तसेच फडके यांना मारहाण केली. तुझा भाऊ पत्रकार तेजस फडके हा पैसे खाऊन बातम्या देतो. तो काय माझं वाकड करणार आहे. माझा भाऊ दौलत शितोळे कोण आहे, तुम्हाला माहीत नाही का...? असे म्हणून जर तुम्ही पोलिस तक्रार केली तर तुला बघून घेईन असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली.

संजय संजय शितोळे हा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि शिंदोडीचे उपसरपंच दौलत शितोळे यांचा भाऊ असून त्याने गावात अनेकवेळा दारु पिऊन लोकांना मारहाण केलेली आहे. परंतु, त्यांच्या दहशतीमुळे कोणीच आत्तापर्यंत पोलिसात तक्रार दाखल केलेली नाही. त्यामुळे संजय शितोळे आणि त्यांचे नातेवाईक दौलत शितोळे याच्या नावाखाली गावात कोणालाही दम देऊन विनाकारण त्रास देत आहेत.

संजय शितोळे याच्यावर शिरुर पोलिस ठाण्यात ३२३,५०४,५०६,४२७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत. दौलत शितोळे यांनी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत माढा मतदारसंघातून निवडणुक लढविली होती. दौलत शितोळे हे शिरुरचे विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांचे कट्टर समर्थक असून, पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि विद्यमान खासदार गिरीश बापट, जलसंपदा मंत्री राम शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांचा भाऊ संजय शितोळे हा गावात दारु पिऊन दादागिरी करुन सर्वसामान्य लोकांना त्रास देत आहे, असा आरोप पत्रकार तेजस फडके यांनी केला आहे. संजय शितोळे याच्या पासून माझ्या सर्व कुटुंबीयांना धोका आहे. आम्हाला पोलिस संरक्षण मिळावे, असे निवेदन पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिप पाटील यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या