रांजणगाव पोलीसांकडून सराईत गुन्हेगार अटकेत

No photo description available.रांजणगाव गणपती, ता.४ ऑगस्ट २०१९ (प्रतिनिधी) :  रांजणगाव एमआयडीसी  पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी रांजणगाव येथील साई गणेश पंपावर गस्त घालत असताना दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शुक्रवारी (ता. 2) रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अमोल नलगे व विजय शिंदे हे रांजणगाव येथील साई गणेश पेट्रोल पंपावर गस्त घालत असताना त्यांना पंपावरील एम.एच.१ एम.ए. ४७६२ या गाडीत काही संशयित व्यक्तींचा हालचाली दिसून येत होत्या. त्यामुळे नलगे यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रफुल्ल कदम यांच्याशी संपर्क केला व त्यांना घटनास्थळी पाचारण करून या संशयितांना तत्काळ ताब्यात घेतले.

यावेळी आरोपींना पोलीसांना पोलिसी खाक्या दाखवला असता सदर आरोपींनी पुणे नगर महामार्गावर खंडाळा माथा येथे एका वाहनचालकाला लुटला असल्याची कबुली दिली.घटनेचे गांभिर्य लक्षात घेत रांजणगाव पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवली.यावेळी अमोल भास्कर शेलार वय (२२.रा. शिरपूर तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर)  व विलास रमेश लोंढे (वय२८, रा.मकनपुर,ता.नेवासा, जिल्हा अहमदनगर) व अन्य तीन जणांनी योगेश बापू हजारे यांचा एम.एच.१६ ए.ई. ७५०१ हा  टेम्पो अडवून या चोरट्यांनी त्याच्याकडील ३१०० रुपये व मोबाईल लूटला असल्याचे योगेश बापू हजारे यांनी रांजणगाव पोलिसांना माहिती दिली.सदर आरोपींनी यापूर्वी अहमदनगर व सातारा जिल्ह्यात दरोडे व इतर गुन्हे केले असल्याचे रांजणगाव पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पुढील तपास पोलिस पोलीस निरीक्षक मनोज कुमार यांच्या मार्गदर्शनानुसार रांजणगाव पोलीस करत आहेत.

या आरोपींना पकडण्याकामी सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस हवालदार तुषार पंधारे,पोलीस नाईक अजित भुजबळ, प्रफुल्ल भगत, पोलीस कॉन्स्टेबल अमोल नलगे, विजय शिंदे, उद्धव भालेराव यांनी हि कामगिरी केली. पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील यांनी या तपास पथकाला बक्षिस जाहिर केले असल्याचे तपास पथकातील पोलीसांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या