मांडवगण पोलीसांमुळे तिघांना मिळाले जीवदान (Video)

Image may contain: sky and outdoorमांडवगण फराटा, ता.६ ऑगस्ट २०१९ (प्रमोद राजगुरु) : पुराच्या पाण्यात पाण्याचा अंदाज न आल्याने अडकलेल्या ट्रकमधील तिघांना मांडवगण पोलीसांच्या तत्परतेने जिवदान मिळाल्याची घटना घडली.

याबाबत सविस्तर असे कि, पुणे येथील मालवाहू ट्रक हे निघोज येथून कांदा भरल्यानंतर ते चेन्नईला माल घेउन चालले होते. भिमा नदीला पुर आल्याने मांडवगणच्या बहुतांश भागात पाणी शिरले असून, मुख्य रस्त्यावरही पाणीच पाणी झाले आहे. यावेळी याच रस्त्याने जाणा-या मालवाहू ट्रकला अंधारात राञीच्या वेळेस पाण्याचा अंदाज न आल्याने दोन ट्रक मांडवगण गावानजीक मुख्य रस्त्यावर पुराच्या पाण्यात अडकले. अगदी काचेच्या जवळ पाणी आल्याने दोन ट्रकमधील अभिमान साळुंके,सागर साळुंके, गजानन पुंजकर या  व्यक्तींनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बॅंकेचा राञपाळीवर असणा-या वॉचमन ने या व्यक्तींचा आवाज ऐकला व तत्काळ मांडवगण पोलीस चौकीत धाव घेउन या वेळी उपस्थित पोलीस कर्मचा-यांना याबाबत कळविले.यावेळी डयुटीवर असणा-या  मांडवगण फराटा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार आबासाहेब जगदाळे, योगेश गुंड, होमगार्ड धर्मराज खराडे, पोलीस मिञ अक्षय काळे यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बोटीच्या सहाय्याने ट्रक मध्ये अडकलेल्या तीन व्यक्तींची सुखरुप सुटका केली.

मांडवगण फराटा पोलीसांनी दाखवलेल्या तत्परतेने तिघांचे प्राण वाचल्याने या पोलीस कर्मचा-यांचे कौतुक होत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या