शिरुरच्या युवा स्पंदनचा 'फ्रेन्डशिप डे - विथ पोलीस'

Image may contain: 22 people, people smilingशिरूर, ता.६  ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुरच्या युवा स्पंदन संस्था व युवा वाद्य पथक व यांच्या वतीने  ‘फ्रेंडशिप डे – विथ पोलीस’या उपक्रमाचे शिरुरला आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात सुमारे ४० युवक सहभागी झाले होते.

याविषयी बोलताना युवा स्पंदनची पायल वर्मा म्हणाली की, ‘पोलीस हे नेहमीच आपल्याला चांगले कार्य करण्यासाठी प्रवृत्त करत असतात. परंतू शिस्त लावताना अनेकदा त्यांना कठोर व्हावे लागते, त्यामुळे तरुणाईमध्ये अनेकदा पोलिसांच्या बाबतीत अनेक गैरसमज निर्माण होतात. यामुळे पोलिसांकडे पाहण्याचा तरुणाईचा दृष्टीकोन बदलतो. हा दृष्टीकोन बदलण्यासाठी त्यांच्याबरोबर मुक्त संवाद होणे आवश्यक आहे. यातील पहिले पाउल म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये महाविद्यालयातील युवक युवतींनी पोलीस ठाण्याला भेट दिली. शिरूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यासोबत संवाद साधण्यात आला. त्यामुळे तरुणाईला देखील पोलीसांचा दृष्टीकोन समजण्यास मदत झाली. या उपक्रमात  पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे,पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे व कर्मचारी सहभागी झाले होते.

या उपक्रमाविषयी बोलताना शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल शिंदे म्हणाले की, अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने घेण्यासाठी सामाजिक संस्थानी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पोलीस हे नेहमीच प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असून त्यांना मदत करण्यासाठी आजच्या तरुणाईने पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपल्या सभोवती घडणाऱ्या बेकायदेशीर घटनांची माहिती तरुणाईने दिल्यास सामाजाचे स्वास्थ्य राखण्यास निश्चितच हातभार लागेल. या कार्यक्रमाचे आयोजन मानसी ढवळे, आकांक्षा वळे ,अथर्व वीरशैव शिवम वाघ ,अजिंक्य महाजन ,प्रतीक काशीकर , तनुजा रासकर यांनी केले होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या