...त्यांचा सन्मान करताना त्यांना अश्रू अनावर

Image may contain: 16 people, people sitting and people standingशिरुर,ता.६ ऑगस्ट २०१९ (प्रतिनीधी) : सेवाभावी वृत्तीने काम करणा-या मतिमंद मुलींच्या संस्थेतील कर्मचा-यांचे अनुभव ऐकुन सोमेश्वर पतसंस्थेच्या अध्यक्षा पुजा कंद या काहीकाळ भावनाविवश झाल्या.

शिरुर येथे पुजा कंद यांच्याहस्ते शिरुर येथील शासकिय मतिमंद मुलींच्या शाळेतील सेवा करणा-या कर्मचा-यांचा कपडे देउन सन्मान करण्यात आला.पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, विशेष मुलींचा सन्मान करणे हे खुप अवघड आणि आव्हानात्मक काम आहे. सेवाभावी वृत्ती ठेवुन निस्वार्थपणे मुलींचा शासकिय संस्थेत सांभाळ केला जातो हे खुप मोठे काम असुन कर्मचा-यांच्या कामाचा योग्य सन्मान करणे कर्तव्यच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.या प्रसंगी शिरुर नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य समिती सभापती विनोद भालेराव,लोणीकंद च्या सरपंच अनिता कंद यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

शासकिय मतिमंद मुलींचा सेवाभावी वृत्तीने सांभाळ करणा-या या संस्थेतील ४ पुरुष व १६ महिलांचा कंद यांच्या हस्ते कपडे व गुलाबपुष्प देउन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रथमच आगळावेगळा सन्मान करणा-या कर्मचा-यांचा सत्कार केल्याने कर्मचा-यांना भावना आवरता येत नव्हत्या.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस सरचिटणीस राहुल शिंदे,कविता कंद,हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे विशाल कंद,अविनाश तापकिर,सुभाष कोळपे, वडगाव रासाईचे ग्रा.पं.सदस्य सचिन शेलार,उमेश शेळके,कुणाल धाडिवाल,शैलेश जाधव, तबरेज शेख, पवन ब्राम्हणी, अशपाक शेख, मनसेचे अविनाश घोगरे, स्वप्निल माळवे, सुशांत कुटे, रविंद्र गुळादे, आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या