शिरूर तालुक्यात 'या' हॉटेलमध्ये मिळते चविष्ठ मिसळ

Image may contain: food
शिरूर, ता. 11 ऑगस्ट 2019: मिसळचे नाव काढले तरी तोंडाला पाणी सुटते. झणझणीत मिसळ हा खवय्यांचा लाडका मेनू. प्रत्येकाचा वकुब वेगळा असला तरी दर्जेदार मिसळपावमुळे काही हॉटेल्स गर्दीने ओसंडून वाहतात. चवदार मिसळ आणि लालजर्द तर्री सर्वांना कोणाला आवडत नाही बरं...

शिरूर तालुक्यात दिवसेंदिवस मिसळपावची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढली चालली आहे. गरमागरम मटकी-फरसाणचे जमलेले चवदार मिश्रण आणि त्याच्यावर लालजर्द तर्री...अहाहा! प्रत्येक खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी मिसळपावचे एवढे वर्णन पुरेसे...

www.shirurtaluka.comने अनेकदा मिसळ या विषयावर चर्चा घेतली आहे. प्रत्येक वेळी प्रतिक्रियांच्या माध्यमातून अनेकजण विविध हॉटेलची नावे सांगातात. शिरूर शहरच नव्हे तर छोट्या-छोट्या गावांमध्येही चविष्ठ मिसळ मिळते. वाचकांच्या आग्रहास्तव आम्ही विविध ठिकाणी जाऊन Videoच्या माध्यमातून मिसळचे शुटिंग करणार आहोत अन् मिसळ खवय्यांसमोर ठेवणार आहोत. यामुळे खवय्यांनाही नवनवीन हॉटेलमधील मिसळीची चव चाखता येणार आहे. तर हॉटेलधारकांनी आपला पत्ता आमच्याशी शेअर केल्यास आम्ही थेट आपल्या हॉटेलमध्ये येऊन मिसळचे शुटींग करू.
संपर्कः
तेजस फडके : 9766117755 / 9423020103
shirurtaluka@gmail.com

वाचकांनी फेसबुकवर प्रतिक्रियांच्या माध्यमातून विविध हॉटेलची नावे प्रसिद्ध केली आहेत...

मिसळचे अनुभव प्रतिक्रियांच्या माध्यमातून जरूर शेअर करा...

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या