शिरुर हवेलीतील विकासकामांसाठी ६ कोटींचा निधी उपलब्ध

Image may contain: 1 person, smilingशिरुर,ता.११ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुर हवेली मतदारसंघातील गावांतर्गत रस्ते व सभागृहांसाठी सहा कोटी निधी उपलब्ध झाल्याची माहिती शिरुर हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना पाचर्णे यांनी सांगितले कि,ग्रामविकास विभागाच्या २५१५ योजनेतुन श गाव अंतर्गत रस्ते,स्मशानभुमी,हायमॅक्स लॅम्प,सभागृह बांधकामे आदी कामांसाठी पाच कोटी निधी मंजुर झाला असुन तसेच स्व.माजी आमदार बाबुराव दौंडकर यांचे रांजणगाव गणपती येथे बांधलेले स्मारक हे निधीअभावी अपुर्णावस्थेत होते.याबाबत समितीचे अध्यक्ष मदन फराटे यांनी राज्यमंञी बाळा भेगडे यांच्या बरोबर आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या बरोबर अर्थमंञी सुधीर मुनगंटीवार,ग्रामविकासमंञी पंकजा मुंडे,मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.यावेळी स्मारकास सभागृह बांधकामांसाठी एक कोटी तत्काळ निधी मंजुर करण्यात आले.

गाव सुधारणा कामांसाठी पाच कोटी रुपये निधी मंजुर करण्यात आला.मंजुर केलेली कामे पुढीलप्रमाणे(कंसात मिळालेला निधी) :
शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे न्हावरा इनामगाव रस्ता व काटे गोरे वस्ती रस्ता करणे( १५ लक्ष),वढु बु येथे चाफावाडा वस्ती ते आपटी रस्ता करणे(१० लक्ष),वढु.बु.येथे खोरी वस्ती रस्ता ते वाजेवाडी-चौफुला रस्ता करणे(१० लक्ष),वढु,बु.हायमास्ट दिवे(३ लक्ष),गुणाट येथे भोस-गव्हाणे वस्ती रस्ता(१५ लक्ष),तांदळी येथे सावता महाराज मंदिर सभामंडप(१० लक्ष),पारोडी येथील सातकरवाडी येथे हनुमान सभामंडप(७ लक्ष) कमळजाई देवी रस्ता(३ लक्ष),न्हावरे येथील दौंडकरवस्ती-दरेकरवस्ती रस्ता(१५ लक्ष),शिरुर शहरातील मुस्लिम समाज स्वच्छतागृह (८ लक्ष),बो-हाडेमळा ते रामलिंग रस्ता(२० लक्ष),आंबळे येथे हायमास्ट दिवे(३ लक्ष),मांडवगण फराटा येथील बाळकाका-संभानाना फराटेवस्ती रस्ता(२०लक्ष),गोलेगाव येथील कानिफनाथ वस्ती रस्ता(५लक्ष),अण्णापुर येथील कु-हेवस्ती सभा मंडप(५ लक्ष),इनामगाव येथील शिवनगर-नांद्रेमळा रस्ता(१०लक्ष),आंधळगाव येथे विठ्ठलनगर मंदिर सभामंडप(७ लक्ष) पांडुरंग चौक सुधारणा(५लक्ष),शिक्रापुर येथील स्मशानभुमी उत्तरेकडील आरसीसी भिंत ६ पाय-या बांधणे(१० लक्ष),शिक्रापुर येथील भैरवनाथ वजनकाटा शेजारी कॉलनी करणे(१०लक्ष),कासारी येथील श्रीकृष्ण मंदिर सभामंडप बांधकाम(८लक्ष),शिक्रापुर-राउतवाडी म्हस्कोबा मंदिर परिसर सुधारणा(१०लक्ष),शिक्रापुर हायमास्ट बसविणे(३ लक्ष),कोरेगाव भिमा येथील नगरवाट-अरविंद गव्हाणेवस्ती रस्ता(१५लक्ष),विठ्ठलवाडी येथे ड्रेनेज लाईन(५ लक्ष),कोरेगाव भिमा येथे गव्हाणे तालीम व्यायामशाळा बांधणे(१०लक्ष),विठ्ठलवाडी येथील डालवस्ती(ढमढेरेवस्ती)रस्ता(१०लक्ष),भांबर्डे-पिंगळेवस्ती रस्ता(१०लक्ष),शिंदोडी येथील दलित वस्ती सुधारणा(३ लक्ष),आंबळे येथील अविनाश व सर्जेराव बेंद्रे वस्ती रस्ता(२०लक्ष),

हवेली तालुकयातील नायगाव येथे अस्मिता भवन(१० लक्ष),खामगाव (टिळेकरवाडी) येथे बाळासाहेब म्हेञे रस्ता (१० लक्ष),पेरणे येथील मावलाय चौक-कदमवाक वस्ती रस्ता(२० लक्ष),केसनंद येथील शौर्यपार्क अंतर्गत रस्ता(५ लक्ष),वाघोली येथील गणेशनगर डोमखेलरस्ता गार्डन सुधारणा(१०लक्ष),डोंगरगाव येथील डोमाळेवस्ती-गडदेवस्ती रस्ता(१०लक्ष),शिंदवणे येथे स्मशानभुमी घाट व शेड बांधकाम(१०लक्ष),उरळीकांचन येथील वॉर्ड क्र.५ बाळासाहेब सदन ते खरात घर रस्ता कॉंक्रिटीकरण(३ लक्ष),उरळीकांचन येथील वॉर्ड क्र.६ भाडळे प्लॉट काळेघर ते जगताप घर रस्ता कॉंक्रिटीकरण(३ लक्ष),खामगाव टेक(टिळेकरवाडी) येथे जि.प.शाळा ते पोपट कादबाने  घरापर्यंत कॉंक्रिटीकरण(६लक्ष),उरळीकांचन येथे वॉर्ड क्र.६ येथील साईनगर गोगावले घर ते मोरे घर कॉंक्रिटीकरण रस्ता(३लक्ष),पिंपरीसांडस येथील भैरवनाथ मंदिर-ग्रामपंचायत कार्यालय रस्ता(१५लक्ष),आव्हाळवाडी येथील गणेश कुटे घर ते संतोष आव्हाळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता(१० लक्ष),कुंजीरवाडी येथील मारुतीनगर रस्ता(१०लक्ष),उरुळीकांचन येथील ज्योतिबा  मंदिर-तुपे वस्ती रस्ता(१०लक्ष), खामगाव टेक(टिळेकरवाडी) येथे जि.प.शाळा ते पन्नालाल टिळेकर रस्ता कॉंक्रिटीकरण(५लक्ष),परेणे येथील साईकॉलनी अंतर्गत रस्ता(५ लक्ष),पेरणे येथील कायनेटिक सोसायटी रस्ता(१०लक्ष),कोरेगाव मुळ-मोरेवस्ती अंतर्गत रस्ता (५लक्ष),कोरेगाव मुळ येथे ग्रामपंचायत परिसर सुधारणा(५लक्ष),शिंदेवाडी येथील अष्टापुर शिव ते तळई रस्ता (९ लाख),न्हावरे येथील लक्ष्मीमाताई गुणाट रस्ता हायमास्ट(१ लक्ष) आदी कामांना निधी मंजुर झाल्याची माहिती शिरुर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दिली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या