शिरुर तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी

Image may contain: 6 people, crowd and outdoorशिक्रापुर,ता.१२ अॉगस्ट २०१९(प्रा.एन.बी.मुल्ला) : शिक्रापूर परीसरासह शिरुर तालुक्यात बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात आली.

शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे येथील इदगाहमध्ये नमाज पठाण करून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.शिक्रापूरसह परीसरातील सणसवाडी, धानोरे, दरेकरवाडी, पिंपळे जगताप, करंदी, केंदुर, मुखर्इ, कान्हूर मेसार्इ, निमगाव म्हाळुंगी, जातेगाव, कोंढापुरी,कारेगाव, दहीवडी, पारोडी, उरळगाव, न्हावरे, करडे, निर्वी तसेच शिरुर शहर व परिसर आदी ठिकाणी मोठया उत्साहात नमाज पठण करून इद साजरी केली.

इद हा सण हिंदू–मुस्लिम ऐक्याचे तसेच बलीदानाचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे अनेक हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदगाह जवळ हजर राहून तसेच घरोघरी जावून शुभेच्छा दिल्या.बकरी ईद निमीत्त शिक्रापूर,शिरुर,रांजणगाव एमआयडीसी पोलीसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.तसेच मुस्लिम बांधवांना नमाजला जाताना व येताना रस्ता ओलांडताना अडथळा येवू नये म्हणून वाहतुकीचे सुयोग्य नियोजन केले होते.नमाज पठण झाल्यानंतर राष्ट्रामध्ये शांतता रहावी व सर्वधर्मीय एकोपा रहाण्यासाठी तसेच पूरग्रस्तांवर ओढवलेले संकट दूर होण्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करण्यात आली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या