शिरुरला रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

Image may contain: outdoorशिरुर,ता.१२ अॉगस्ट २०१९(अभिजित आंबेकर) : 'रामलिंग महाराज कि जय' 'हर हर महादेव' च्या जयघोषात शिरुर शहर व पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी श्रावण महिन्याच्या दुस-या सोमवारी रामलिंग(जुने शिरुर) येथे दर्शनासाठी एकच गर्दी केली होती.

शिरुर शहरापासून चार कि.मीच्या अंतरावर रामलिंग मंदिर आहे.दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरत असते याशिवाय  दर सोमवारी व श्रावण महिन्यात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी रामलिंग मंदिरात येतात. श्रावण महिनात शिरुर शहर व परिसरातील शेकडो भाविक दररोज पहाटे पायी दर्शनासाठी रामलिंगला येत असतात.आज श्रावण महिन्यातील दुस-या सोमवार मुळे पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.शिरुर शहर व पंचक्रोशीचे आराध्य दैवत प्रभु श्री रामलिंग महाराजांच्या दर्शनास श्रावण महिन्यात पंचक्रोशीतील भाविकांबरोबरच अहमदनगर,श्रीगोंदा, पारनेर,जुन्नर,आंबेगाव या ठिकांणाहुन अनेक भाविक दर्शनासाठी आले होते.

शिरुर शहरापासुन तीन किलोमीटर अंतरावर असणा-या प्रभु श्री.रामलिंग महाराजांच्या दर्शनासाठी सकाळपासुन ते सायंकाळ पर्यंत भाविकांनी दर्शनास लांबच लांब रांगा लावलेल्या होत्या.दर्शनास आलेल्या भाविकांना देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर्शनासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने सुरक्षेसाठी होमगार्ड यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या