शिरूर पोलिसांच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल (Video)

Image may contain: one or more people, people sitting and people standingशिरूर, 19 ऑगस्ट 2019: मांडवगण फराटा येथील पोलिसांनी एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला पट्ट्याने बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, पोलिसांच्या समर्थनासाठी मांडवगण परिसरातील गावे बंद ठेवण्यात आली.

मांडवगण फटारा पोलिस चौकीतील ही घटना आहे. मुलीच्या छेडछाड प्रकरणीवरुन पोलिसांनी संबंधीत युवकाला 21 वेळा पट्ट्याने बेदम मारहाण केली. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपण छेडछाड केली नसल्याचा दावा त्या युवकाने केला आहे. मात्र, मांडवगण फराटा पोलिसांनी यावर मौन बाळगले आहे.

दरम्यान, श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेच्या मुख्याध्यापकांनी रोडरोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी निवेदन दिले होते. त्यामुळे पोलिस योग्य ती कारवाई करत आहेत. महाविद्यालयीन तरुणीच्या छेडछाडप्रकरणी युवकावर केलेल्या कारवाईच्या समर्थनार्थ मांडवगण परिसरातील सादलगाव, वडगाव रासाई, कुरुळी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी, इनामगाव, तांदळी गणेगाव दुमाला, बाभूळसर बुद्रुक आदी गावे बंद ठेवण्यात आली होती. सोशल मीडियावर नेटिझन्सनी या मारहाणीचे समर्थन करतानाच काहींनी निषेधही नोंदवला आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या