शिरुरला कारच्या धडकेत फिटरचा दुर्दैवी मृत्यू

No photo description available.शिरूर, ता. २५ ऑगस्ट २०१९ (मुकुंद ढोबळे) : पुणे-नगर महामार्गावर शिरूरनजीक सतरा कमानी पुलाजवळ बिघडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी आलेला फिटर चा रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात आलेल्या युको कार जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात फिटर चा मृत्यू झाला आहे.

हा अपघात (दि.२४) रोजी घडला.तर शौकत करीम देशमुख (वय,४५ रा. भाजी बाजार शिरूर)असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या फिटर चे नाव आहे.याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाने,जवळा येथील लहू दरेकर यांची जीप नादुरुस्त झाली होती. ही जीप दुरुस्त करण्यासाठी दुपारी बाराच्या दरम्यान शिरूर वरून शौकत देशमुख या फीटरला घेऊन लहू दरेकर सतरा कामिनी पुलाजवळ आले.रस्त्याच्या विरुद्ध बाजूस असलेल्या जीपकडे रस्ता ओलांडून जात असताना रस्ता अचानक पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारे भरधाव वेगात आलेली इको कार ने फिटर शौकत देशमुख यांना जोरदार धडक दिली.

या अपघातात त्यांच्या डोक्याला हाताला पायाला गंभीर दुखापत झाली त्यांना उपचारासाठी शिरूर येथील खाजगी रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.याबाबत लहू रंगनाथ दरेकर (रा. जवळा,ता.पारनेर) यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असून इको कार चालक श्रीकांत वसंत कुदळे (रा.पिंपळे निलख, पुणे) याच्यावर भरधाव वेगात कार चालवून अपघात घडून अपघात मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणीपुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे  हेडकॉन्स्टेबल चौधरी करीत आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या