सादलगावला कोट्यावधींच्या फसवणुकप्रकरणी एकास अटक

No photo description available.सादलगाव,ता.२६ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : गुंतवणुक केलेल्या पैसाचा चांगला परतावा मिळवुन देतो असे सांगुन नागरिकांकडुन घेतलेले कोट्यावधी रुपये परत देण्यास टाळाटाळ केल्याने शिरुर पोलीसांनी एकास अटक केली आहे.

याबाबत विशाल महादेव परभाने(रा.वडगाव रासाई) यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे.तर या प्रकरणी संतोष गणपत माने(वय.३६,रा.सादलगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,यातील आरोपी संतोष यांचे मॅकेनिकल स्पेअर पार्टचा व्यवसाय असुन आरोपी याने श्री एन्टरप्रायझेस अॅंड कॉन्ट्रॅक्टर हि कंपनी असल्याचे सांगुन मी विडिया टुल्स केनामोल इंडिया लिमिटेड बेंगलोर या कंपनीशी व्यापार करतो व त्यातुन मला चांगला परतावा मिळवुन देतो असे सांगत फिर्यादी विशाल परभाने (२७ लाख),साक्षीदार संतोष ज्ञानोबा खोरे(१५ लाख),सुहास रामराव शेलार(१ कोटी २० लाख),किसन आबासाहेब नलगे(४ कोटी ७८ लाख), आदेश भुजंगराव नागवडे(१ कोटी ५६ लाख) यांच्याकडुन एकुण मिळुन सुमारे ७ कोटी ९६ लाख इतकी रक्कम विडिया टुल्स केनामोल इंडिया लिमिटेड,बेंगलोर या कंपनीच्या गुंतवणुकिच्या स्वरुपात घेतले होते.हे घेतलेले पैसे बराच काळ परत न दिल्याने व गुंतवणुकिवर परतावा न दिल्याने यातील फिर्यादी व साक्षीदार यांनी पैसे मागण्यास सुरुवात केली माञ आरोपी याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

याबाबत फिर्यादी यांनी शिरुर पोलीस स्टेशनला धाव घेउन तक्रार दिल्यानंतर शिरुर पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे.शिरुर तालुक्यात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली असुन तालुक्यात प्रथमच मोठा घोटाळा उघडकिस आला आहे.या प्रकरणी पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या