पञकार धर्मा मैड व चंद्रकांत आंबिलवादे यांची निवड

Image may contain: 13 people, people smiling, people standingशिरुर, ता. २६ ऑगस्ट २०१९(प्रतिनीधी) : शिरुर येथील पत्रकार धर्मा मैड व पैठण येथील पञकार चंद्रकांत अंबिलवादे यांची  महाराष्ट्र राज्य लाड सोनार महाअधिवेशन समिती संपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य लाड सोनार महाअधिवेशन समितीचे स्वागत अध्यक्ष नितीन उदावंत- सावखेडकर यांनी अहमदनगर येथे झालेल्या बैठकित महाअधिवेशन समिती संपर्क व प्रसिद्धी प्रमुखपदी शिरुर येथील पत्रकार धर्मा मैड व पैठण येथील पत्रकार चंद्रकांत अंबिलवादे यांची निवड जाहीर केली.

यावेळी महाराष्ट्र राज्य लाड सोनार महाअधिवेशन समितीचे स्वागत अध्यक्ष नितीन उदावंत-सावखेडकर, सुकाणू समिती सदस्य राजेंद्र डहाळे,माजी नगराध्यक्ष व शिरुर सोनार समाज अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष अशोक कुलथे, माधवराव दहीवाळ, संगमनेर येथील सुभाष शहाणे, परभणी येथील दिलीप डहाळे,संजय बोकन, जालना येथील गोपाळ नेवासेकर,औरंगाबाद येथील नंदु चिंतामणी, शशिकांत उदावंत, गणेश श्रीमाळी, सुनिल टेहरे, राम लोळगे यांसह समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या निवडीसाठी  उपस्थित समाज बांधवांनी या दोघांच्या निवडीला सहमती दर्शविली. यावेळी सुकाणू समिती सदस्य सदस्य राजेंद्र डहाळे यांनी धर्मा मैड यांचा व अशोकराव कुलथे यांनी चंद्रकांत अंबिलवादे यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.यावेळी उपस्थित समाज बांधवांनी निवडीबद्दल अभिनंदन केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या