रांजणगाव गणपती येथे २५ माजी सैनिकांचा सन्मान

रांजणगाव गणपती, ता.२६ ऑगस्ट २०१९ (प्रतिनीधी) : रांजणगाव गणपती येथे २५ माजी सैनिकांसह विविध क्षेत्रात  उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील एका क्लबच्या वतीने माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात वैद्यकीय, धार्मिक, शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, प्रा.एन.बी.मुल्ला, प्रा. नागनाथ शिंगाडे, प्रा.संजय देशमुख, संभाजी गोरडे, पोपट पाचंगे तसेच पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेले रोहिदास पावशे व संतोष सांबरे यांचा सन्मान करण्यात आला.

शरीरसौष्ठव स्पर्धेत विशेष कामगिरी केलेले मिस्टर एशिया भारत श्री जुबेर शेख, अभिजीत घाडगे, सूर्या सूर्यवंशी, प्रताप सिंग, संजय हीलगे यांना देखील विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. या कार्यक्रमास बापूसाहेब शिंदे, नामदेव पाचुंदकर, तुकाराम फंड, रघुनाथ फंड, महेश फंड, संतोष परदेशी, नेताजी फंड, रामदास लांडे, कानिफ शेळके, गणेश चिकणे, राहुल शेळके, ज्ञानेश्वर फंड आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेकानंद फंड यांनी केले तर रघुनाथ फंड यांनी आभार मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या