शालेय कराटे स्पर्धेत शिक्रापूर परीसरातील शाळांचे यश
तळेगाव ढमढेरे, ता 30 ऑगस्ट 2019: तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेत शिक्रापूर परीसरातील शाळांनी घवघवीत यश मिळविले. स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविलेल्या खेळाडूंची बारामती येथे होणाऱया जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
पुणे जिल्हा क्रीडा परीषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रांजणगाव गणपती(ता.शिरूर) येथे तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 14, 17 व 19 वर्षाखालील वयोगटात व विविध वजन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी निवड झालेले शिक्रापूर परीसरातील खेळाडू व त्यांच्या शाळा पुढीलप्रमाणे : नमीरा मुल्ला, मोहीनी आघाव (अजिंक्यतारा इंग्लिश मेडियम स्कूल शिक्रापूर), पूर्वा मुळे, त्रिशाली ढमढेरे (अमॄतवेल ग्लोबल स्कूल शिक्रापूर), राजनंदीनी मोरे, अथर्व मोरे, कार्तीक सासवडे, रोहीत सासवडे, समर्थ चौधरी, रोहन सासवडे (ग्लोरी इंग्लिश मेडियम स्कूल कोरेगाव भिमा), मॄणालीणी रायकर, गणेश दाते, शुभम शिंदे (विद्याधाम प्रशाला शिक्रापूर), वैष्णवी बेंडभर, साहील जाधव (रसिकभा} धारीवाल माध्य.विद्यालय गणेगाव खालसा) या सर्व खेळाडूंनी प्रथम क्रमंक पटकावला तर रिया चौरसीया, रोहन पिंपरकर(अमॄतवेल ग्लोबल स्कूल शिक्रापूर), ओंकार वाळूंज (विद्याधाम प्रशाला शिक्रापूर) या खेळाडूंनी द्वितीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी खेळाडू शिक्रापूर येथील इंद्रप्रस्थ कराटे अकादमीत प्रशिक्षण घेत आहेत. या खेळाडूंना कराटे प्रशिक्षक सोमनाथ अभंग यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे शिरूर तालुका कॄषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, युवा उद्योजक मंगेश सासवडे, शिक्षक परीषदेचे तालुका कार्याध्यक्ष प्रा.एन.बी.मुल्ला यांनी अभिनंदन केले.