कारेगावजवळ भरधाव स्विफ्ट कारने दोघांना उडविले

No photo description available.कारेगाव,ता.३० अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : कारेगाव नजीक फलकेमळा येथे भरधाव वेगाने जाणा-या स्विफ्ट कारने दोघांना उडविले असल्याची घटना घडली.

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,कारेगाव नजीक फलकेमळा चौकात दोन व्यक्ती राञीच्या सुमारास रस्ता ओलांडत  होते.यावेळी नगरकडुन पुणेच्या दिशेने भरधाव वेगाने जाणा-या स्विफ्ट कारने दोन पादचा-यांना उडविले.या झालेल्या अपघातात दोघांना ही गंभीर इजा झाल्याने त्यांना जवळच्या दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले माञ उपचारांपुर्वीच मयत झाल्याचे डॉक्टरांनी निदान केले.

अपघाताची माहिती कळताच रांजणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेउन पंचनामा केला आहे.या प्रकरणी स्विफ्ट चालकावर गुन्हा नोंदविला जात असल्याचे पोलीसांनी सांगितले.अपघातातील मयतांची नावे समजु शकली नाही.पुढील तपास
रांजणगाव पोलीस करत आहे.
(सविस्तर माहिती लवकरच...)

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या