उत्पादन वाढीसाठी शेतीशाळा उपयुक्त : साजना इंगळे

Image may contain: one or more people, crowd and outdoorदहीवडी,ता.३१ अॉगस्ट २०१९(प्रतिनीधी) : ऊस पिकाचे उत्पादन वाढण्यासाठी शेतीशाळा उपयुक्त ठरत असुन या उपक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन मंडळ कृषि अधिकारी साजना इंगळे यांनी केले.

Image may contain: 13 people, people standingदहीवडी (ता.शिरूर) येथे कृषि विभागाच्या माध्यमातून ऊस शेतीशाळा हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात 30 शेतकऱ्यांची निवड केली असुन प्रात्यक्षिक प्लॉट करण्यात येणार आहे प्रात्यक्षिक प्लॉट मध्ये दर पंधरा दिवसानी निरीक्षणे घेण्यात येणार असुन त्या आधारे उपाय योजना करण्यात येणार आहे. शेतीशाळा उपक्रमात लागवडी पासून ते काढणी पर्यंतचे सर्व तंत्रज्ञान प्रत्यक्ष शेतावर देण्यात येणार आहे.शेतीशाळेत शेतकऱ्यांचा ग्रुप करून शेतावर किड व रोगाचे निरीक्षणे,चित्रीकरण, सादरीकरण, विशेष अभ्यास, सांघीक खेळ मागोवा या नियोजनच्या आधारे सकाळी 9 ते 12 दरम्यान कार्यक्रम दर पंधरा दिवसातुन एकदा होणार आहे.

शेतीशाळेत तज्ञ प्रशिक्षक कृषि सहायक जयवंत भगत यांनी बेणे प्रक्रिया, बेणे निवड, लागवडीच्या पध्दती, तण नियंत्रण लागवड करताना खत व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले तसेच कृषि विभागाच्या विविध योजना बाबत साजना इंगळे यांनी माहिती दिली.शेतीशाळा या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त करताना हनुमंत इंगळे शेतीशाळा उपक्रमामुळे निश्चित उत्पादन वाढेल अशा प्रतिक्रिया दिल्या.नाथा इंगळे यांनी ही यापुर्वी शेतकऱ्याच्या होत असलेल्या व्यवस्थापन बाबत चुकापुढील काळात होणार नसल्याबाबत सांगितले.तसेच भानुदास सात्रस यांनीही तंत्रज्ञानाचा वापर कधीही वाया जात नसून त्यांचा अवलंब करण्याचे आवाहन केले. कैलास ढमढेरे यांनी हि शेतीशाळा उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले

शेतीशाळा उपक्रमा यशस्वी होण्यासाठी कृषि मित्र शरद इंगळे, संपत ढमढेरे, तसेच कृषि सहायक संध्या सांडभोर यांचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे आभार शरद इंगळे यांनी केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या