...त्यांचा 'हा' डोळस निर्णय तुम्हांलाही ठरेल आदर्शवत

Image may contain: 8 people, people standingन्हावरे,ता.१ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : स्वत: अपंग असुनही त्याची तमा न बाळगता काम करणा-या 'त्या' युवकाने घेतलेला निर्णय समाजातील सर्वांनाच आदर्शवत ठरणारा असा आहे.

न्हावरे येथील युवक सुदर्शन जगदाळे असं त्या युवकाचं नाव आहे.उच्चविद्याविभुषित असलेला तरुण ऐन तारुण्यात अचानक अपघातानं अपंगत्व आल्याने गेल्या अनेक वर्षांपासुन अंथुरणाला खिळुन आहे.अचानक आलेले अपंगत्व स्विकारत मोठ्या जिद्दीने त्या युवकाने राजकारणात भरारी घेतलीय.सध्या ते राष्ट्रवादीचे पश्चिम महाराष्ट्राचे सोशल मिडियाचे सचिव म्हणुन काम पाहत आहे.त्यांचा संपर्क तसा मोठा.एक कोटी अजित पवार व सुप्रिया सुळे समर्थक या फेसबुकवरील ग्रुपच्या माध्यमातुन राज्यातील काणाकोप-यात पोहोचलेला हा तरुण.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब ते पक्षातील दिग्गज नेते या कार्यकर्त्याला अगदी नावानिशी ओळखतात.शिरुर तालुक्यात आलेला महाराष्ट्रातील पक्षातील नेता या कार्यकर्त्याला भेटल्याशिवाय कधीच पुढे जात नाही.

याविषयी सुदर्शन जगदाळे यांनी सांगितले कि,अवयवदान हे जगातले सर्वात श्रेष्ठ दान असुन आपल्यामुळे एकाचे तरी प्राण वाचुन आयुष्य सुखकर होइल.हा अनेक दिवसांचा संकल्प पुर्ण झाला असुन समाजातील प्रत्येकाने अवयवदानासाठी पुढे येण्याचे आवाहनही जगदाळे यांनी केले.स्वत: अपंग असुनही या युवकाने जिद्दीने मात करत पक्षाचे काम निष्ठेने करत आहे.अवयव दानाचे महत्व जाणुन त्यांनी नुकताच अवयवदानाचा संकल्प पुर्ण करत अर्ज भरुन दिला.जगदाळे यांनी घेतलेल्या निर्णयाचे शिरुर तालुका व परिसरात स्वागत होत असुन या माध्यमातुन इतरांनाही ख-याअर्थाने प्रेरणा दिली आहे.

राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर,माजी आमदार अशोक पवार,पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार सुदर्शन जगदाळे यांची भेट घेत कौतुक केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या