स्थानिक गुन्हे शाखेकडून सराईत गुन्हेगार जेरबंद

Image may contain: 11 people, people smiling, people standingपुणे,ता.४ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : करडे(ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्य व गोल्डमॅन म्हणुन प्रसिद्ध असलेल्या अंकुश बांदल यांच्यावर हल्ला करणा-या दुस-या सराईत गुन्हेगारास पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी दिली.

याबाबत पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार,करडे (ता.शिरुर) येथील ग्रामपंचायत सदस्य अंकुश बांदल यांच्यावर  रविवार(दि.१) रोजी जीवघेणा हल्ला करणारा करण्यात आला होता.यावेळी शिरुर पोलीसांना ग्रामस्थांच्या मदतीने मोठ्या धाडसाने  सुमारे दोन तास चाललेल्या थरारनाट्यानंतर अट्टल गुन्हेगाराला पकडण्यात यश आले होते.यावेळी या हल्ला करताना एक हल्लेखोर पळुन गेला होता.याबाबत सुरज राजाराम बांदल यांनी शिरुर पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती.

करडे येथे झालेल्या हल्ल्यानंतर घटनास्थळी गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी भेट दिली होती.त्यानंतर दुसरा आरोपी पकडण्यासाठी घनवट यांनी तपासाची सुञे हलवत पथके विविध ठिकाणी रवाना केली होती.

गुन्हे शाखेचे पथक आरोपीचा कसुन तपास करत असताना पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, या हल्ल्यातील दुसरा आरोपी हा वाघोली परिसरात असल्याचे समजले.त्यानुसार गुन्हे शाखेचे पथक वाघोली परिसरात सापळा रचुन थांबलेले असताना, एक व्यक्ती अंगामध्ये टि-शर्ट आणि जिन्स पॅन्ट परिधान केलेला अंदाजे 37 वर्ष वयाचा आलेला गुन्हे शाखेच्या पथकाला दिसला.पथकाने त्यास पाहून त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता, तो पळून जावू लागला.पथकातील कर्मचा-यांनी त्याचा धाडसाने पाठलाग करून त्यास झडप घालुन ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेनंतर संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता अमोल विश्वास ओव्हाळ (रा.वृंदावन, रामनगर, पेरणेफाटा, ता.हवेली जि.पुणे) असे आरोपीने नाव सांगितले.या आरोपीला ताब्यात घेउन पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.सदर आरोपी हा सराइत गुन्हेगार असुन या आरोपीवर निगडी पोलीस स्टेशनला तीन ,भुईंज पोलीस स्टेशन,सातारा,शिरूर पोलीस स्टेशन,हडपसर पोलीस स्टेशन,चिंचवड पोलीस स्टेशन आदी ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.

आरोपीला पकडण्याकामी पोलीस अधीक्षक संदीप पाटील,अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना,उप विभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा, गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उप-निरीक्षक अमोल गोरे,सहायक पोलीसउपनिरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, पोलीस नाईक विजय कांचन, राजु मोमीन, जनार्दन शेळके,धिरज जाधव, बाळासाहेब खडके अक्षय जावळे या तपास पथकाने हि कामगिरी केली.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या