घोडगंगाच्या संचालकपदी शंकरराव फराटे यांची निवड

Image may contain: 1 person, close-upमांडवगण फराटा,ता.५ सप्टेंबर २०१९(वार्ताहर) : शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या स्विकृत संचालकपदी मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील शंकर फराटे इनामदार यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.

नुकत्याच झालेल्या घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या बैठकित सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला.या वेळी कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार अशोक पवार,उपाध्यक्ष संतोष रणदिवे,माजी उपाध्यक्ष बाबसाहेब फराटे,सुभाष कळसकर,दत्ताञय फराटे,मनिषा सोनवणे,जगन्नाथ वराळे,उत्तम सोनवणे,प्रशांत होळकर आदी संचालक निवडीवेळी उपस्थित होते.

शंकरराव फराटे इनामदार यांनी मांडवगण फराटा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष म्हणुन काम पाहिले असुन ते सध्या राष्ट्रवादीचे तालुकाउपाध्यक्ष म्हणुन शिरुर तालुक्यात परिचित आहे.निवडीनंतर बोलताना फराटे यांनी सांगितले कि,माजी आमदार व कारखान्याचे चेअरमन अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाला सोबत घेउन प्रामाणिकपणे शेतकरी हितासाठी काम करणार असल्याचे सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या