शिरुरला नगरपरिषदेसमोर मनसेचे धरणे आंदोलन सुरु

Image may contain: 7 people, people sittingशिरुर,ता.५ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : नैसर्गिक ओढे,नाले यांच्यावर झालेले अतिक्रमण व इतर मागण्यांसाठी गुरुवार(दि.५) पासुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने शिरुर नगरपरिषदेसमोर धरणे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.

मनसेचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष अविनाश घोगरे,मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे,वाहतुक सेनेचे रविंद्र गुळादे हे धरणे आंदोलनास बसले आहेत.या वेळी मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे बोलताना म्हणाले कि,नैसर्गिक ओढे,नाले या संदर्भात शिरुर नगरपरिषदेकडे सातत्याने गेल्या तीन महिन्यांपासुन मनसेकडुन पाठपुरावा केला जात आहे.परंतु यावर कुठलेही ठोस पावले उचलले गेल्याचे निदर्शनास आले नाही.नैसर्गिक ओढे नाले खुले करा,नैसर्गिक नाले व ओढे यांना संरक्षक भिंती तातडीने बांधाव्या,ओढ्यांवर झालेले अतिक्रमण काढावे,यांवर सुरु असलेले बांधकामे तात्काळ थांबवुन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच या ओढे नाले संबंधी तातडीने चौकशी लावावी या मागण्यासाठी मनसेच्या वतीने धरणे आंदोलन सुरु करत असल्याचे घोगरे यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष कैलास नरके,जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर,नगरसेवक मंगेश खांडरे, माजी मनसेचे शहराध्यक्ष संदिप कडेकर,मस्लिम जमातचे अध्यक्ष इक्बालभाई सौदागर,महंमद हुसेन पटेल,चांदभाई बळभट्टी,रामभाऊ इंगळे,प्रमोद  गायकवाड,सुभाष जैन,डॉ.वैशाली साखरे,तारुअक्का पठारे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या