शिरुर-हवेलीत २५० हून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Image may contain: 13 people, people smiling, people standingरांजणगाव गणपती, ता.६ सप्टेंबर २०१९ (प्रतिनिधी) : शिरुर-हवेलीत राष्ट्रवादीला खिंडार पाडत २५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.

रांजणगाव गणपती(ता.शिरुर) येथील आयोजित करण्यात आलेल्या बुथ कार्यकर्ता मेळाव्यात नुकतेच हे पक्षप्रवेश करण्यात आले.याप्रसंगी शिरूर-हवेली मधील २५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.यावेळी पक्षाने नव्याने भारतीय जनता पार्टीमध्ये नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक देण्यात येणार असून जुन्या कार्यकर्त्यांना योग्य तो न्याय देणार असल्याचे प्रतिपादन राज्यमंत्री व सह पालकमंत्री संजय भेगडे यांनी रांजणगाव गणपती येथे केले.तर भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी शिरुर-हवेलीचे आमदार हे भाजपचे भावी मंञी म्हणून आपल्याला हवे आहेत असे आपल्या मनोगतात व्यक्त केले.

याप्रसंगी शिरूर-हवेली मधील राष्ट्रवादी काँग्रेस,व इतर सामाजिक संघटनांच्या २५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये  राज्यमंत्री संजय ऊर्फ  बाळा भेगडे,जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व आमदार बाबूराव पाचर्णे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशामध्ये प्रामुख्याने निमोणे  गावचे माजी सरपंच विजय भोस,कर्डेलवाडी चे माजी सरपंच संतोष कर्डिले,सोन्याबापु दसगुडे, आण्णापुर चे  माजी सरपंच गोविंद कुरुंदळे,नागरगाव चे विद्यमान सरपंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खांद्या कार्यकर्त्या मनीषाताई शेलार यासह यांचा अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्ष  प्रवेशाने आपला विजय सुकर झाला असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी यावेळी सांगितले.तसेच राज्यांमध्ये ज्याप्रमाणे भाजपमध्ये मेगा भरती चालू आहे त्याच धर्तीवर शिरूर-हवेली मध्ये लवकरच पुन्हा मेगा भरती करणार असल्याचे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी यावेळी सांगितले.

या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,आमदार बाबूराव पाचर्णे, कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश ताठे,भाजपचे तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके, पुणे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, कारेगावचे सरपंच अनिल नवले यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या