शिक्षकदिनानिमित्त २५ सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

Image may contain: one or more peopleशिरुर,ता.६ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरुरला शिक्षकदिनानिमित्त हुडकोवसाहतीतील सुमारे २५ सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

शिरुर येथील हुडकोवसाहतीतील छञपती संभाजी मिञमंडळ हे गेल्या अनेक वर्षांपासुन विधायक उपक्रम राबवत असुन यावर्षीही अनोख्या पद्धतीने गणेशोत्सव या मंडळाकडुन साजरा केला जात आहे.५ सप्टेंबर या शिक्षकदिनाचे औचित्य साधुन या मंडळाने हडकोवसाहतीतील सेवानिवृत्त झालेल्या शिक्षक-शिक्षिकांना सन्मानचिन्ह,शाल,श्रीफळ,गुलाबपुष्प देउन सुमारे २५ शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.यावेळी आयुष्यात सेवानिवृत्त झाल्यानंतर प्रथमच अशा प्रकारे सन्मान करण्यात आल्याच्या भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या.यावेळी छञपती संभाजी  मिञमंडळाचे अध्यक्ष संतोष मिरजकर,नगरसेविका उज्ज्वला वारे,व्यवस्थापिका शोभना पाचंगे,विकास वारे,शैलेश जाधव,निलेश पवार,सागर पांढरकामे,भुषण रणदिवे,उमेश शेळके,अंजिक्य तारु,अनिकेत घोगरे,सुरज नलावडे,महेंद्र गदादे,प्रणव गुरव,ओंकार मेंडसे,दिपक साठे,अतुल कोठावळे आदी उपस्थित होते.

सांगली व कोल्हापुर येथे नुकत्याच झालेल्या महापुराने अनेकांचे मोठे नुकसान झाले.या पुरग्रस्तांना समाजातील प्रत्येक घटकाकडुन मदतीचा हात दिला जात असताना याही मंडळाने गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेत पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तु थेट जाउन पोहोच केल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या