ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना रुग्णालयातून 'डिस्चार्ज'

Image may contain: 4 people, people standing and indoorशिरूर,ता.६ सप्टेंबर २०१९ (प्रतिनिधी) : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रकृती व्यवस्थित असून शुक्रवार (दि. ६) रोजी सकाळी डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. आकाश सोमवंशी यांनी दिली.

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सर्दी व खोकल्याचा  त्रास,  झाल्याने तसेच तपासणी नंतर निमोनायटीस झाल्याने त्यांना शिरुर येथील खासगी रुग्णालयात प्रकृती अस्वास्थ्यामुळे (दि.३) रोजी दाखल करण्यात आले होते.त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयात उपचार सुरु होते.जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे यांच्या बरोबर हॉस्पिटल मध्ये त्यांचे पुतणे सुनील हजारे, माजी सरपंच जयसिंग मापारी, लाभेश औटी हे दवाखान्यात सलग दोन दिवस उपचारांवर  लक्ष ठेवुन होते.

यानंतर प्रकृती पुर्णपणे ठिक झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्या सर्व सहका-यांशी चर्चा करुन हजारे यांना रुग्णालयातुन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान त्यांना बरे वाटावे म्हणुन अनेक कार्यकर्त्यांनी देवाकडे प्रार्थना केल्या. रुग्णालयाबाहेर नागरिकांनी गर्दी केली होती तसेच अण्णासाहेब हजारे यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा फौजफाटा याठिकाणी नेमण्यात आला होता. दरम्यान त्यांना आरामाची गरज असल्याने कोणालाही भेटु दिले नाही.

शुक्रवार(दि.६) रोजी सकाळी रुग्णालयातुन देण्यापुर्वी आण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली. यावेळी शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे व हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर,कर्मचारी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या