गणेशोत्सवानिमित तंबाखुमुक्ती व व्यसनमुक्तीचा जागर

Image may contain: 14 people, people smiling, people standingमांडवगण फराटा, ता.७ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत गणेशोत्सवानिमित्त श्री वाघेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठाण संचलित लोकनेते श्री दादा पाटील फराटे काॅलेज ऑफ बी फार्मसी व फराटे पाटील काॅलेज ऑफ डी फार्मसी येथे बुधवार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

गणेशोत्सवानिमित्त सर्वञ विविध कार्यक्रम आयोजित केले जात असताना मांडवगण फराटा(ता.शिरुर) येथील लोकनेते श्री दादा पाटील फराटे काॅलेज ऑफ बी फार्मसी व फराटे पाटील काॅलेज ऑफ डी फार्मसी महाविदयालयात तंबाखुमुक्ती व व्यसनमुक्तीचा जागर करण्यात आला.तंबाखू नियंत्रण कार्यक्रमामध्ये घडवू व्यसनमुक्त महाराष्ट्र हा विचार सर्व विद्यार्थ्यांनी मनात रुजवला."माझी शाळा/कार्यालय,माझे घर व परिसर तंबाखूमुक्त ठेवण्याचा आम्ही सदैव प्रयत्न करू,तसेच यावेळी 'आता करा एकच काम,बीडी सिगारेट राम राम','आता एकच नारा,करूया तंबाखूमुक्त परिसर सारा',अशा घोषणा देण्यात आल्या. भारत शासनाच्या तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू अशी शपथ घेत सर्वांनी तंबाखुपासुन दुर राहण्याचा निश्चय केला.

यावेळी रांगोळी स्पर्धा आणि फार्मा मॉडेल एक्स्पो चे आयोजन करण्यात आले होते.या सर्व कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष राजीव फराटे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे,सचिव मृणाल फराटे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत कांबळे व प्रा.विवेक सातपुते,राष्ट्रीय सेवा कार्यक्रम अधिकारी प्रा.अविनाश ढोबळे, प्रा.सागर खर्डे, प्रा.प्रविण चोळके, प्रा.अनिता नजन,प्रा.मंगेश हारोळे, प्रा.योगेश जोंधळे आदी उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या