शिरसगाव काटा ग्रामस्थांचा सर्वधर्मसमभाव कौतुकास्पद

Image may contain: 8 people, people smiling, people standingशिरसगाव काटा,ता.१० सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिरसगाव काटा येथील ग्रामस्थांनी जोपासलेले सामाजिक ऐक्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन शिरुर-हवेलीचे माजी आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले.

Image may contain: 14 people, people smiling, people standing and indoorशिरसगाव काटा(ता.शिरुर) येथे पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांच्या जि.प च्या ७ लाख रुपये निधी व १४ व्या वित्त आयोगातील ५ लाख असे मिळुन १२ लाख खर्चुन उभारलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व बुद्धविहाराचे उद्घाटन माजी आमदार अशोक पवार यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले कि,शिरसगाव काटा येथे आमदार असताना मोठ्याप्रमानावर निधी देता आल्याने मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली.तसेच पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार यांच्याही निधीतुन गावात विकासकामे सुरु असुन विकासासाठी हि भविष्यात अग्रेसर राहिल.पवार यांनी ग्रामस्थांच्या सामाजिक ऐक्याचे यावेळी कौतुक केले.
शिरुर तालुका राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवि काळे,बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे यांची यावेळी भाषणे झाली तर बामसेफ चे गोरक्ष वेताळ यांचे विशेष व्याख्यान झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडगंगा संचालक नरेंद्र माने यांनी केले सुञसंचालन दत्ताञय लोंढे यांनी केले तर आभार माजी सरपंच रामचंद्र केदारी यांनी केले.

दरम्यान शिरसगाव काटा ग्रामस्थांच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व बुद्ध विहारात लोकसहभागातुन ५० हजार रुपये किंमतीची मुर्तीची भगवान गौतम बुद्धांची मुर्ती देण्यात आली.या वेळी या विहारात या मुर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली.यावेळी घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा.सुभाष कळसकर, संचालक शंकर फराटे,दत्ताञय फराटे,सरपंच पल्लवी किरण जगताप,उपसरपंच शिवाजी सोनटक्के, माजी सरपंच संजय शिंदे, सतीश चव्हाण, एम.एस.कदम, प्रकाश जाधव,शरद चोरमले,विकास जगताप, माणिक कदम, सुभाष फराटे, बाळासाहेब कदम, सोसायटीचे चेअरमन हनुमंत माने, पोलीस पाटील शितल गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष सागर गराडे आदी उपस्थित होते. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंचशिल तरुण मंडळाचे अध्यक्ष शरद जाधव, उपाध्यक्ष मारुती केदारी, योगेश केदारी, भानुदास दादा केदारी, सुरेश केदारी, संदिप केदारी आदींनी परिश्रम घेतले. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या