शिरुरला प्रामाणिक अधिका-याचा बुलेट गाडी देऊन सन्मान

Image may contain: 15 people, people smiling, people standingशिरूर,ता.१२ सप्टेंबर २०१९(प्रा.संदीप घावटे) : शिरूर पंचायत समितीत शिक्षण विभागात प्रामाणिकपणे केलेल्या उत्कृष्ट  कार्याची दखल घेत केंद्रप्रमुख व शिक्षकांकडून त्या अधिका-यास बुलेट गाडी भेट देण्यात आली.

मुळचे कळमकरवाडी येथील असणारे बाळकृष्ण कळमकर हे शिरूर येथे गेली सात वर्ष विस्तार अधिकारी व  प्रभारी गटशिक्षणाधिकारी म्हणून काम करत होते.या काळात शिक्षण क्षेत्राचा चेहरामोहरा बदलण्याचे कार्य त्यांनी केले.शिष्यवृत्ती परीक्षेत संपूर्ण महाराष्ट्रात शिरूर तालुक्याने प्रथम क्रमांक पटकावताना अनेक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले.शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात पुणे जिल्हा परिषदेत शिरूर तालुक्याला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.यात कळमकर यांचे योगदान मोठे आहे.शिक्षकांचे प्रश्न, प्रलंबित कामे, शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी कळमकर यांनी प्रामाणिक काम केले.नुकतीच त्यांची खेड पंचायत समितीत बदली झाली.तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख व शिक्षकांनी कळमकर यांना एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांची क्लासिक बुलेट गाडी भेट देऊन त्यांना सपत्नीक सन्मान करून आगळावेगळा निरोप दिला.

यावेळी शिरूर पंचायत समितीचे सभापती  विश्वास कोहकडे, उपसभापती जयमाला जकाते, माजी सभापती सुभाष उमाप, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, सर्व पंचायत समिती सदस्य,विस्तार अधिकारी वंदना शिंदे,सर्व केंद्रप्रमुख, शिक्षक संघटना पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या