राष्ट्रवादीला रामराम ठोकत कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

Image may contain: 9 people, people standing and indoorवडगाव रासाई,ता.१४ सप्टेंबर २०१९(वार्ताहर) : शिरुर तालुक्यातील पुर्व भागातील वडगाव रासाई,मांडवगण फराटा येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे जाउन शिवसेना नेते व राज्यसभेचे खासदार संजय राउत यांच्याहस्ते शिवबंधन बांधुन घेत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष विरेंद्रकाका शेलार,योगेश फराटे,महेबुब सय्यद,सोमनाथ शेलार धनंजय विलास शेलार,हनुमंत शेलार,अमित शेलार,विशाल शिंदे यांच्यासह वडगाव रासाई व मांडवगण फराटा गावातील सुमारे ३५-४० कार्यकर्त्यांनी शिवसेना भवन येथे जाउन शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.यावेळी राज्यसभेचे खासदार व शिवसेना नेते संजय राउत यांनी या कार्यकर्त्यांची हाती शिवबंधन बांधले.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके,शिवसेनेचे शिरुर तालुकाप्रमुख व घोडगंगा कारखान्याचे संचालक सुधीर फराटे इनामदार,खरेदी विक्री संघाचे संचालक आबासो सोणवणे,संत तुकाराम सोसायटीचे चेअरमन बाळासो ढमढेरे,माजी चेअरमन गणेश मचाले,गणेश माणिक फराटे,वैभव फराटे,मोहन शेलार,रणजित ढवळे आदी यावेळी उपस्थित होते.

वडगाव रासाईचे विरेंद्रकाका शेलार हे माजी आमदार अशोक पवार यांचे निकटवर्तीय व कट्टर समर्थक मानले जात असुन माजी आमदारांच्या गावातुन कार्यकर्त्यांनी केलेला शिवसेना प्रवेश हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.तर विरेंद्रकाका  शेलार यांनी पक्षातील अंतर्गत कलहामुळे पक्ष सोडत असुन शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर कटके,
शिवसेना शिरुर तालुकाप्रमुख व घोडगंगा कारखान्याचे संचालक सुधीर फराटे इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे विरेंद्रकाका शेलार यांनी बोलताना सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या