शिरुर-आंबेगाव मधील शिवसेनेचे कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर
टाकळी हाजी,ता.२४ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : शिवसेनेचे शिरुर आंबेगावचे युवानसेनेचे प्रमुख माउली घोडे यांच्या भाजप प्रवेशानंतर शिरुर आंबेगाव मधील अनेक कार्यकर्ते भाजपच्या वाटेवर असल्याचे समजते
राज्यात आदर्श आचारसंहिता लागु झाली असुन अद्याप कोणत्याच पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर केली नसली दोन दिवसांत उमेदवारांची यादी जाहिर होण्याची दाट शक्यता आहे.तत्पुर्वी शिरुर तालुक्यात पक्ष बदलाचे जोराचे वारे वाहत आहे.
यात निवडणुकिपुर्वी अनेकांनी राष्ट्रवादी,कॉंग्रेस व इतर पक्ष सोडत असतानाच शिरुर-आंबेगाव विधानसभेतील महत्वाच्या असणा-या टाकळी हाजी गटात युवासेनेचे तालुकाप्रमुख माउली घोडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजप मध्ये नुकताच मंञी बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे.त्यांच्या या प्रवेशाने शिरुर-आंबेगाव मध्ये शिवसेनेला भगदाड पडायला सुरुवात झाली असुन येत्या काही दिवसांत अनेक कार्यकर्ते शिवसेनेला रामराम ठोकत भाजप मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा या परिसरात सुरु आहे.माउली घोडे यांचे टाकळी हाजी गटात युवकांचे मोठे संघटन असुन पक्षातील नाराजीमुळे भाजपात प्रवेश केला असल्याचे घोडे यांनी बोलताना सांगितले.