पुण्यात पावसाचा हाहाकार; शिरूरला झोडपले (Video)

Image may contain: sky, outdoor, water and nature
शिरूर, ता. 26 सप्टेंबर 2019: पुणे शहरात पावसाने हाहाकार उडवून दिला असून, भिंत कोसळून व पाण्यामुळे 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय, अनेक जनावरे पाण्यात वाहून गेले. शिरूर तालुक्यालाही पावसाने बुधवारी (ता. 25) रात्री झोडपून काढले.

शिरूर तालुक्यातील विविध भागांमध्ये बुधवारी रात्री मुसळधार पाऊस पडला. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे. काही ठिकाणी बाजरीची पिके पाण्यात आडवी झाली आहेत.

Image may contain: outdoor
भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू...
पुण्यात बुधवारी रात्री झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे पद्मावतीजवळील अरण्येश्वर येथे भिंत कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला असून, तर, अन्य ठिकाणी दोन असे एकूण नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. काही जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यात बुधवारी रात्री नऊच्या सुमारास झालेल्या पावसाने अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले. तर, रस्ते जलमय झाले होते. शेकडो वाहने वाहून गेली आहेत.

पद्मावतीजवळील अरणेश्वर येथील टांगेवाले कॉलनीत ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने भिंत कोसळली. या दुर्घटनेत रोहित भरत आमले (वय 13), संतोष कदम (वय 55), सौंदलीकर (वय 32) आणि त्यांचा 9 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. तर, शिंदे हायस्कुलनजीक नाल्यात 1 महिलेचा मृत्यू झाला आहे. तर, सिंहगड रोड रस्त्यावर एकाचा मृत्यू झाला आहे.

शाळा व महाविद्यालयांना सुटी...
पुणे शहर व उपनगरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीसदृश पावसामुळे पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपत्त्कालीन परिस्थिती निर्माण झालेली असल्याने त्याचा परिणाम शालेय विद्यार्थी यांच्यावर होऊ नये, याकरिता पुणे जिल्ह्यातील पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती या तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांना आज (गुरुवार) सुटी जाहीर करण्यात आली आहे.

No photo description available.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी शाळा व महाविद्यालयांना सुटी जाही करण्यात आल्याची माहिती दिली. पुणे शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारी रात्री मात्र ढगफुटीसदृश पाऊस पडला. त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या