श्री वसंतराव फराटे पाटील महाविद्यालयात कन्या पूजन

Image may contain: 26 people, people smiling, people standingमांडवगण फराटा, ता. 16 ऑक्टोबर 2019 (रोहित कांबळे): येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांस्कृतिक विभाग अंतर्गत जागतिक कन्या दिनानिमत्ताने प्रियांका काटे यांचे व्याख्यान आयोजीत केले होते.

संस्काराची जोड दिली तर आयुष्य सुंदर बनेल व प्रत्येक मुलीने सक्षम होऊन स्वतःची ओळख निर्माण करावी. आवडत्या क्षेत्रात करियर करण्यासाठी आत्ताच त्याची निवड करावी तसेच आपले व आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे मत मांडल कन्यापुजनाच्या कार्यक्रमामध्ये प्रियांका काटे म्हणाल्या, 'संधीची वाट न पाहता मिळालेल्या क्षणास संधी समजून स्वताला सिद्ध करा. जिजाऊ. सावित्री रमाई यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जीवनात मार्गक्रमण करा.' कन्यापुजनाच्या व दांडियाच्या कार्यक्रमाला मातापालकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतीसाद मिळाला.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणालताई फराटे पाटील, प्राचार्य तुकाराम सावंत, प्रा. सुरेखा देशमुख, प्रा. जयराम पवार, अश्विनी शिंदे, प्रा. सुप्रिया जाधव, प्रा. सुप्रिया आटोळे, प्रतिभा गिरमकर, सचिन खंदारे, मनीषा कळसकर, अश्विनी शेळके आदी उपस्थित होते.

मांडवगणमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापन दिन साजरा
Image may contain: 1 person, standing
मांडवगण फराटा, ता. 26 सप्टेंबर 2019 (रोहित कांबळे): मांडवगण फराटा येथील श्री वसंतराव फराटे पाटील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभाग अंतर्गत 24 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.

प्रा. राजकुमार कदम यांनी स्पंदने युवा मनांची या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आजच्या परिस्थितीचे भान ठेऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यश प्राप्त करून विविध क्षेत्रात समाजाची सेवा करावी हे विविध उदाहरणातून समजावून सांगितले. आयुष्यात जे आपल्याला हवे ते मिळाले तर जगण्याला गंमत व आनंदाला किमंत उरणार नाही. म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येकाने जिद्दीने यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

तंबाखू व्यसनमुक्ती या अभियान अंतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करून संबंध हेल्थ फाऊंडेशन ला वेळोवेळी माहितीची पूर्तता करून महाविद्यालयाला महाराष्ट्रातील पहिले सुवर्ण व कास्य पदक मिळाले, त्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. जयराम पवार व प्रा.सौ सुरेखा देशमुख यांना मिळालेली सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजीव फराटे पाटील, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, सचिव मृणालताई फराटे पाटील, प्राचार्य डॉ. तुकाराम सावंत यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा जयराम पवार व प्रा. सुरेखा देशमुख व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सुरेखा देशमुख यांनी केले व आभार प्रा जयराम पवार यांनी मानले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या