शिरुर-हवेली विधानसभेसाठी पहिल्या दिवशी अल्प प्रतिसाद

शिरूर, ता.२७ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकिसाठी शुक्रवार (दि.२७) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असुन शिरुर विधानसभेसाठी सहा नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

विधानसभेच्या निवडणुकिसाठी नुकतीच आदर्श आचारसंहिता लागु झाली असुन शुक्रवार(दि.२७) पासुन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या दिवशी केवळ सहा नामनिर्देशन पञे इच्छुक उमेदवारांनी नेले आहेत.अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ४ ऑक्टोबर असल्याने शेवटच्या दोन दिवसांत इच्छुकांची उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होणार आहे.

दरम्यान, पोलीस व प्रशासनाच्या वतीने निवडणुकिसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून शिरुर तहसिल कार्यालय आवारात सीसीटिव्ही बसवले असुन पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.सकाळी ११ ते साडेतीन पर्यंत तहसिल कार्यालयात कोणालाच प्रवेश नसल्याने अनेक नागरिकांची तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ गर्दी झालेली होती. निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त गर्दी करु नये,प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. शिरुर हवेली विधानसभेसाठी एकुण ३ लाख ८१ हजार २२८ इतके मतदार असुन ३७६ मतदान केंद्रे आहेत तर पु्रुष मतदार १ लाख ९८ हजार ९६९ इतके असुन स्ञी मतदार : १ लाख ८२ हजार २४९ व इतर मतदार १० आहेत.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या