घोडगंगेच्या सर्वसाधारण सभेला हजर राहण्याचे आवाहन

न्हावरे, ता.२८ सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : घोडगंगा कारखान्याच्या सर्वसाधारण सभेला तालुक्यातील सर्व सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेनेचे तालुकाप्रमुख व घोडगंगेचे संचालक सुधीर फराटे इनामदार यांनी केले आहे.

याबाबत बोलताना त्यांनी सांगितले कि,शिरुर तालुक्यातील घोडगंगा कारखाना तालुक्यातील शेतक-यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.गेल्या काही वर्षात घोडगंगा कारखान्याची अत्यंत वाताहत झाली असुन घोडगंगा कारखाना मालकीची ५ एकर जमीन,त्याचप्रमाणे सभासदांच्या उसाला मिळत असलेला इतर कारखान्यांच्या तुलनेत कमी बाजारभाव हे महत्वाचे मुद्दे आहेत.

सभासदांनी सभासदांच्या मालकीचा कारखाना टिकवण्यासाठी योग्य निर्णय घेणे गरजेचे असल्याने मोठ्या संख्येने सभासदांनी कारखाना कार्यस्थळावर(रविवार दि.२९) रोजी दुपारी उपस्थित राहण्याचे आवाहन सुधीर फराटे इनामदार यांनी केले आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या