धाडसाने पकडलेल्या त्या आरोपींकडून गंभीर गुन्हे उघड

Image may contain: 10 people, people standing, shoes and indoorशिरुर,ता.२८ सप्टेंबर २०१९(प्रतिनीधी) : बॅंकांजवळ नागरिकांना पाळत ठेवुन लुटणा-या टोळीला सिनेमात,चिञपटात शोभेल अशा पद्धतीने गुन्हे शाखेच्या जिगरबाज पोलीसांनी स्टेट बॅंकेजवळ धाडसाने पकडल्यामुळेच त्या आरोपींकडुन गंभीर गुन्हे उघडकिस आले आहेत.

गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलेल्या प्रसाद शामदास कुंचला (वय.३०, रा.बिटरगुंटा, ता.नेल्लुर आंध्रप्रदेश), श्रीनिवास एस. सुक्रमानियन (वय.४५, रा.मदुराई, तामिळनाडू) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे जिल्हयात गेल्या अनेक दिवसांपासुन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. शिरुर शहरात गेल्या महिनाभरापुर्वी बॅंकेतुन पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून दिवसाढवळ्या लुटण्याची घटना घडली होती. हे गुन्हे उघडकिस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर उभे राहिले होते.

गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांनी जिल्हयात घडणा-या घटना पाहता गुन्हे शाखेची विविध पथके आरोपी शोधण्याकामी रवाना केली होती.शिरुर पोलीस स्टेशनला दाखल चो-यांचा तपास करत गुन्हे शाखेने कसुन तपास सुरु ठेवला होता.तसेच तांञिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली होती. यावेळी माहिती घेत असताना आंध्रप्रदेश,तामिळनाडु येथील काही आरोपी बॅंका व परिसरात नागरिकांवर लक्ष ठेवुन अंगावर घाण टाकणे,लोखंडी बॉल बेअरींगच्या साहाय्याने वाहनांचे काच फोडणे,अंगावर खाज सुटण्याची पावडर टाकणे,वाहनांचे काचांवर अॉइल टाकणे, रस्त्यावर पैसे पडले आहेत असे सांगुन सदर आरोपी गुन्हे करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. दरम्यान यातील आरोपींची माहिती घेत असताना शिरुर परिसरात संशयित आरोपींची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.यावेळी सापळा रचलेला असताना आरोपींना संशय आल्याने आरोपी पळ काढला.यावेळी गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करत  आरोपींना ताब्यात घेतले.या आरोपींनी जिल्हयात शिरुर, शिक्रापूर, रांजणगाव, सासवड, इंदापूर आदी ठिकाणी वाहनांच्या काचा फोडुन मोटर सायकलची डिक्की उचकून, रोख रक्कमेची चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.

या आरोपींना पकडण्याकामी गुन्हे शाखेचे प्रमुख पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्ताञय गुंड, सहायक पोलीस उपनिरीक्षक दत्ताञय गिरमकर, दयानंद लिमन, राजू मोमीन, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, जनार्दन शेळके, विजय कांचन, बाळासाहेब खडके, धिरज जाधव यांनी केली. गुन्हे शाखेच्या या पोलीसांचे धाडसाचे शिरुर शहरात कौतुक केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या