Video : शिरुरमध्ये आजी-माजी आमदारांत फाईट...

Image may contain: 1 person
शिरूर, ता. 30 सप्टेंबर 2019: शिरूर तालुक्याचे माजी आमदार व विद्यमान आमदार यांच्यात माईकवरून राडा झाला असून, संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


शिरूर-हवेलीचे आमदार बाबुराव पाचर्णे सभासदांना माकड म्हटल्याने वाद वाढला, तर माजी आमदार अशोक पवार यांच्यात माईक हिसकावून घेण्यावरून वाद झाला. शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची सर्वसाधारण सभा वादळी ठरली. आमदार बाबूराव पाचर्णे हे बसलेल्या सभासदांना माकड म्हटले. त्यावरून शाब्दिक चकमक झाली. यावेळी कारखान्याचे चेअरमन आणि तालुक्याचे आजी माजी आमदार यामध्ये मोठ्या प्रमाणावर शाब्दिक युद्ध रंगले. तर, आमदार आणि चेअरमन यांच्यात माइक ओढा ओढेचे नाट्य घडले अन् ते कॅमेऱयात कैद झाले.


विरोधकांनी चेअरमन चोर आहे, अशा घोषणाबाजी केली. आमदारांनी भर सभेत एकाला माकड म्हटल्यावर वातावरण तापले होते. निवडणुकीच्या आधीच सध्याचे आमदार बाबुराव पाचर्णे व माजी आमदार अशोक पवार यांच्यातील माईक फाईट चर्चेचा विषय ठरली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या