इच्छूक उमेदवारांनी सोमवारपर्यंत नेले ३३ नामनिर्देशनपञे

शिरुर, ता.३० सप्टेंबर २०१९ (प्रतिनीधी) : शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवार(दि.३०) पर्यंत सुमारे ३३ नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असुन शुक्रवार (दि.२७) पासुन अर्ज स्विकारणे सुरु करण्यात आले आहे.शुक्रवारी सहा नामनिर्देशनपञे उमेदवारांसाठी नेण्यात आली होती.त्यानंतर शनिवार व रविवार हा सुट्टीचा दिवस होता. तसेच सुरु असलेला पितृपंधरडा संपल्यानंतर अनेकांनी नामनिर्देशनपञे नेण्यासाठी गर्दी केली होती. सोमवार(दि.३०) रोजी  बहुजन समाज पार्टी, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय जनक्रांती, बहुजन मुक्ती पार्टी, आम आदमी पार्टी,जनता दल, राष्ट्रवादी, अपक्ष असे सुमारे २७ नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली आहेत.तर आज सोमवार अखेर एकुण ३३ नामनिर्देशनपञे नेण्यात आली आहेत.

निवडणुक अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना गैरसोय होउ नये व प्रशासनालाही सुलभता यावी यासाठी शिरुर तहसिलदार कार्यालय येथे विशेष कक्ष स्थापन केलेला आहे.शिरुर च्या तहसिलदार लैला शेख या सहायक निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन काम पाहत आहेत. दरम्यान प्रमुख पक्षांची उमेदवारी यादी दोन दिवसांत जाहिर होण्याची दाट शक्यता असुन इच्छुकांची उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दोन दिवसांतच गर्दी होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या