शिरुरच्या पैलवान बांदलांची आंबेगावातून धांदल

Image may contain: 1 person, smiling, close-upआंबेगाव, ता. २ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : राजकिय डावपेच खेळण्यात पटाईत असलेले पैलवान बांदल हे शिरुर  आंबेगाव विधानसभेतून 'धांदल उडविणार पण कोणाची ? याचीच चर्चा रंगू लागली आहे.

गावचा पार असो जिल्हयाचे ठिकाण जिकडं तिकडं नेहमीच चर्चेत असताना पैलवान मंगलदास बांदल. शिरुरची जिल्हा परिषद निवडणूक असो कि बाजारसमिती असो या झालेल्या निवडणुकित त्यांनी राजकिय कौशल्यपणाला लावत विजयश्री खेचुन आणली होती.लोकसभा निवडणुकित त्यांनी अमोल कोल्हे यांना पाठिंबा देत जाहिर समर्थन करत निवडून नाय आणलं तर राजकिय संन्यास घेइल असे जाहिरपणे सांगितले होते. त्यानंतर अमोल कोल्हे यांचाही मोठा मताधिक्याने विजय झाला होता. त्यांना दरम्यानच्या काळात प्रदेश उपाध्यक्ष पदही पक्षाने देउ केले होते.

शिरुर-हवेली व शिरुर विधानसभेची निवडणुक जाहिर झाल्यानंतरही बांदल यांनी तलवार म्यान केलेली होती.वडगाव रासाई येथे जाहिर कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदिप कंद,आमदार बाबुराव पाचर्णे यांच्यासमवेत हजेरी लावत माजी आमदार अशोक पवार यांच्यावर जाहिरपणे शरसंधान साधले होते.

दरम्यान गेले अनेक दिवसांपासून बांदल यांचा शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघात वावर जास्त वाढला होता. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांत बांदल हे शिवसेना नेत्यांच्या संपर्कात होते. परंतु अचानकपणे गुगली टाकत आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या पैलवान बांदल यांनी आज राष्ट्रवादीचे उमेदवार आपणच असल्याचा दावा करत पक्षाचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला.त्यांनी विधानसभेचे माजी सभापती दिलीप वळसे पाटील यांच्याविरोधात अर्ज भरल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राष्ट्रवादीकडून उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही. बांदल यांना अधिकृत उमेदवारीचे पत्र (एबी फाॅर्म) दिलेले नाही. तरीही त्यांनी शिवसेनेचा नाद सोडून परत राष्ट्रवादीचा तर रस्ता धरला नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ते मुंबई येथे मातोश्रीवर गेल्याची चर्चा होती. ते शिवसेनेकडून निवडणूक लढवणार असा प्रचारही काही त्यांच्या समर्थकांनी आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात सुरू केला होता. गेल्या काही दिवसापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमापासून  व नेत्यांपासून फटकून ते वागत होते. शिवसेनेच्या काही नेत्यांबरोबरव त्यांच्या गुप्त बैठक  झाल्याची चर्चा मतदारसंघात होती .त्यामुळे शिवसेनेकडून त्यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा होती.

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात ते निवडणूक रिंगणात उतरणार अशा पद्धतीच्या चर्चांना उधाण आले होते पण अचानकपणे मंगळवारी त्यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केला तोही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ही माहिती वाऱ्यासारखी आंबेगाव शिरूर मतदारसंघात पसरली. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. सर्वच राजकीय पक्षांना बुचकळ्यात टाकणारे पैलवान अशी त्यांची ची ख्याती असल्यामुळे यापुढे ते नेमकी काय भूमिका घेणार याविषयी या मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उमेदवारांवर अनेक हल्ले केले होते. अशाही परिस्थितीत शिवसेना नेत्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली. ही चर्चा सुरू असतानाच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदारसंघात खळबळ उडाली आहे.

पैलवान बांदल हे राजकिय कौशल्य वापरुन नशीब आजमावण्याचा प्रयत्न करतात अन त्याप्रमाणे डाव टाकत ते यशस्वी होतात हा आजपर्यंतचा इतिहास आहे.बांदल यांनी शिरुर हवेलीतुन नामनिर्देशनपञही नेला आहे. त्याचप्रमाणे शिरुर आंबेगाव मधुनही उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याने यावेळेस पैलवान मंगलदास बांदल कोणाची अन कुठून धांदल उडिवणार याचीच चर्चा ठिकठिकाणी होऊ लागली आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या