शिरुर-हवेलीत प्रदिप कंद यांची भुमिका ठरणार निर्णायक

Image may contain: 2 people, people smiling, close-upशिरुर, ता.३ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : शिरुर-हवेलीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात बंडाळीची शक्यता असून जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद हे काय भुमिका घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. कंद यांची भुमिका निर्णायक ठरणार असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.

शिरुर हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन अधिकृत उमेदवारांची बुधवारी राञी उशिरा जाहिर करण्यात आली. यात शिरुर हवेलीचे माजी आमदार अशोक पवारांना संधी देण्यात आली आहे. अशोक पवार व माजी उपमुख्यमंञी अजित पवार यांचे असणारे जवळचे संबंध यामुळे त्यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारीही फिक्स मानली जात होती. परंतु जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांना ही ऐनवेळी उमेदवारी जाहिर होण्याची शक्यता व्यक्त केली जाण्याची शक्यता होती.

जि.प.चे माजी अध्यक्ष प्रदिप कंद यांच्यासह माजी बांधकाम समिती सभापती मंगलदास बांदल यांनी लोकसभेला उमेदवार अमोल कोल्हे यांचा ठासून प्रचार केला होता. त्यामुळे पक्षाकडुन शिरुर हवेलीत कोणाचा विचार होणार याचीच चर्चा रंगली होती. बुधवारी राञी उशिरा अधिकृत उमेदवारी यादी जाहिर झाल्यानंतर शिरुर हवेलीसाठी अशोक पवार यांचे नाव जाहिर करण्यात आले. त्यामुळे राञी सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला.

दरम्यान, अधिकृत उमेदवारी डावलल्याने प्रदिप कंद समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी झाली असल्याचे दिसून येत आहे. जि.प.चे अध्यक्ष असताना प्रदिप कंद यांनी शिरुर हवेलीत केलेली मोठ्याप्रमाणावर कामे,शिरुर तालुक्यात वाढवलेला जनसंपर्क, कार्यकर्त्यांची तयार केलेली फळी व सक्षम प्रचार यंञणा यामुळे कंद हे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांना जड जाणार असल्याचे बोलले जात असून, उमेदवारी नाट्यानंतर प्रदिप कंद काय भुमिका घेणार याकडे शिरुर हवेलीत लक्ष लागलेले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या