पिंपळसुटीत दुचाकी अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Image may contain: 1 person, outdoorपिंपळसुटी, ता.३ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : पिंपळसुटी (ता.शिरुर) येथे दुचाकीच्या झालेल्या अपघातात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.

प्रशांत बाळू  तावरे (वय.१९,रा.पिंपळसुटी) असे दुर्दैवी अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवार (दि. २) रोजी प्रशांत हा निर्वी-इनामगाव रस्त्याने दुचाकीने प्रवास करत होता. राञी सात ते साडेसातच्या सुमारास पिंपळसुटी गावाच्या नजीक अचानक प्रशांतच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात प्रशांत याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यास तत्काळ दौंड येथे पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारांदरम्यान प्रशांत याचा मृत्यू झाला.

प्रशांत याची घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती असुन त्याच्या अल्पवयात झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाने पिंपळसुटी गावावर शोककळा पसरली असून सर्वञ हळहळ व्यक्त केली जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या