शक्तिप्रदर्शन करत पाचर्णे, पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिरुर, ता. ३ ऑक्टोबर २०१९ (प्रतिनीधी) : ढोलताशा, बॅंड व झांज पथकाच्या दनदनाटाने भाजपाचे महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांनी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. अशोक पवार यांनी वाजतगाजत भव्य रॅलीने आपल्या हजारो समर्थकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

गुरुवार (दि.३) रोजी पाबळ फाटा येथुन विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या समर्थकांनी भव्य रॅली काढलेली होती. त्यानंतर बाजारसमिती येथील शिवछञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला तसेच भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन ही रॅली शिरुर शहरातील पुणे नगररोड वरुन काढण्यात आली.यावेळी पाचर्णे समर्थकांकडुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यानंतर आमदार बाबुराव पाचर्णे यांनी शिरुर तहसिल कार्यालयातील निवडणुक विशेष कक्षात येउन आपला उमेदवारी अर्ज निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे सादर केला.यावेळी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी लैला शेख, भाजपाचे तालुकाध्यक्ष भगवान शेळके, भाजपाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख धर्मेंद्र खांडरे, हवेलीचे तालुकाध्यक्ष रोहिदास उंद्रे, रासपाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कु-हाडे हे उपस्थित होते. आमदार बाबुराव पाचर्णे यांनी दुपारी दोनच्या सुमारास उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केला.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड.अशोक पवार यांनी गुरुवार(दि.३) रोजी साकाळी शिरुर कृषी उत्पन्न बाजारसमिती आवारात जाहिर सभा घेउन आपल्या उमेदवार अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली.यावेळी खासदार अमोल कोल्हे, जिल्हाध्यक्ष प्रदिप गारठकर,सभापती शशिकांत दसगुडे, बाजारसमितीचे संचालक विजेंद्र गद्रे,शिरुर शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी, युवकचे रंजन झांबरे आदींच्या उपस्थितीत जाहिर सभा घेण्यात आली.त्यावेळी अनेकांनी विचार मांडले.यानंतर शिवछञपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयाला तसेच भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करुन ही रॅली शिरुर शहरातील पुणे नगररोड वरुन काढण्यात आली.या वेळी अशोक पवार समर्थकांकडुन पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर दुपारी पावणे तीन च्या सुमारास अशोक पवार यांनी तहसिलकार्यालयातील निवडणुक विशेष कक्षात येउन आपला उमेदवारी अर्ज  निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांच्याकडे सादर केला.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष रवी काळे, बाजारसमितीचे सभापती शशिकांत दसगुडे, आदित्य धारिवाल, माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब नरके हे उपस्थित होते.

वाहनांच्या लांबच लांब रांगा
शिरुर शहरात सकाळपासुनच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने पुणे नगर महामार्गावर व शिरुर शहरातील पाबळ फाटा ते बीजे कॉर्नर पर्यंत एकेरी वाहतुक करण्यात आली होती.एकिकडे राष्ट्रवादीचे झेंडे तर दुसरीकडे भाजपचे झेंडे यामुळे संपुर्ण शहर चारचाकी वाहनांसह कार्यकर्त्यांनी गजबजुन गेले होते.चारचाकी वाहनांच्या दुतर्फा रांगाच रागा लागलेल्या होत्या.संपुर्ण शहर दणानुन गेले होते.

पोलीसांचा तगडा बंदोबस्त
शिरुर शहरात पोलीस बांधवांच्या वतीने तहसिल कार्यालयापासुन ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र कदम (आर्थिक गुन्हे शाखा), पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, सहायक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक भगवान पालवे,पोलीस उपनिरीक्षक राजेश माळी, संतोष कदम, उमेश भगत, विकास कुंभार, कृष्णा व्यवहारे,महिला पोलीस कर्मचारी आदींनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या