Video : दिलीप वळसे पाटील यांना विजयी करण्याचा निर्धार

Image may contain: 5 people, people smiling, wedding and text
शिरूर, ता. 4 ऑक्टोबर 2019 : आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी गुरुवारी (ता. 3) उमेदवारी अर्ज दाखल केला असून, आंबेगाव-शिरूरकरांनी त्यांना विजयी करण्याचा निर्धार केला.

दिलीप वळसे पाटील यांना विजयी करण्यासाठी महाविजय निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होती. यावेळी एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला.


आंबेगाव- शिरूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, गवई गट व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या प्रचारासाठी काढलेल्या पदयात्रेला व जनसंपर्क मोहिमेला मंचर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पूर्वा वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनसंपर्क मोहीम राबविण्यात आली.

Image may contain: 6 people, people smiling, people sitting and indoor
गुरुवारी (ता. 3) दिलीप वळसे पाटील उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत मोठा जनसमुदाय होता. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी मंचर बाजार समितीच्या आवारात जाहीर सभेचे आयोजन केले आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, माजी आमदार पोपटराव गावडे, सूर्यकांत पलांडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, मानसिंग पाचुंदकर, प्रकाश पवार, सुभाष मोरमारे, राजू इनामदार, प्रभाकर बांगर, कामगार नेते बाळासाहेब बाणखेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या