शिरुर-हवेलीसाठी ६ उमेदवारांनी केले ८ अर्ज दाखल

शिरुर, ता. ४ ऑक्टोबर २०१९ (सतीश केदारी) : शिरुर-हवेली १९८ विधानसभा मतदारसंघासाठी गुरुवार(दि.३) रोजी एकूण ६ उमेदवारांनी ८ उमेदवारी अर्ज  दाखल केले असुन गुरुवारपर्यंत सुमारे ५२ नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्रीमंत पाटोळे यांनी दिली.

शिरुर हवेली विधानसभा निवडणुकीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला असुन शुक्रवार (दि.२७) पासुन अर्ज स्विकारणे सुरु करण्यात आले आहे.शुक्रवारी सहा नामनिर्देशनपञे उमेदवारांसाठी नेण्यात आली होती.त्यानंतर शनिवार व रविवार हा सुट्टीचा दिवस होता.मंगळवार(दि.३०) रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस,भाजपा,शिवसेना,मनसे,अपक्ष असे सुमारे १५ नामनिर्देशनपञे इच्छुक उमेदवारांनी नेली आहेत.तर आज गुरुवार अखेर एकुण ५२ नामनिर्देशनपञे नेण्यात आली आहेत.

दरम्यान,आमदार बाबुराव पाचर्णे यांना भाजपाकडुन यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडुन अशोक पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली.यानंतर या दोनही इच्छुक उमेदवारांनी गुरुवार(दि.३) रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले तर बहुजन मुक्ती पार्टी चे कमलाकर लोंढे, नगरसेवक नितीन पाचर्णे, शिवसेनेचे ज्ञानेश्वर कटके यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.

दरम्यान आज शुक्रवार (दि.४) ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी इच्छुकांची गर्दी होणार आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या